दारू विक्री बंदीविरोधात पाचशे याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

औरंगाबाद खंडपीठात चार आठवड्यांनी सुनावणी

औरंगाबाद खंडपीठात चार आठवड्यांनी सुनावणी
औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय व राज्य मार्गावरील मद्याची दुकाने, हॉटेल व बार बंद करण्याच्या तेरा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पाचशे याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने यावर चार आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

न्यायाधीश सी. एस. धर्माधिकारी व मंगेश पाटील यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ही सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून पाचशे मीटरवरील बिअर बार व हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांनी मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल व बार बंद केले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुकाने बंद केल्याचा आरोप करून याविरोधात खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 13 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सुमारे पाचशे याचिका खंडपीठात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दुकाने, हॉटेल किंवा बार पाचशे मीटरच्या अंतरात येतात किंवा नाही याची शहनिशा करून अहवाल देण्याचे सांगितले होते; मात्र अद्याप हा अहवाल खंडपीठासमोर आलेला नाही.

Web Title: aurangabad marathwada news