दुसऱ्या विशेष फेरीत ५९६ प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

अकरावी प्रवेश प्रक्रिया - आज जाहीर होणार रिक्त जागांचा अहवाल

औरंगाबाद - अकरावी प्रवेशाच्या सहा फेऱ्यानंतर रिक्त जागांसाठी दुसरी विशेष फेरी ८ सप्टेंबरपासून घेण्यात आली. या फेरीत सोमवारपर्यंत (ता. ११) ५९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. रिक्त जागांचा अहवाल मंगळवारी (ता. १२) जाहीर करण्यात येणार आहे. 

यंदापासून शहरात महापालिका हद्दीतील महाविद्यालयांत अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार गुणवत्ता याद्या व एक विशेष फेरी अशा पाच फेऱ्या तसेच स्पॉट ॲडमिशनची एक विशेष फेरी अशा सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता ही दुसरी विशेष फेरी ८ सप्टेंबरला घेण्यात आली. यामध्ये एकूण ५९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चिती केली असून प्रथम पसंती देणाऱ्या ३८२ विद्यार्थ्यांपैकी २९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. दरम्यान, एक प्रवेश नाकारण्यात आला. तर कोणतीही पसंती देणाऱ्या ४३५ पैकी ३०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून यातही एक प्रवेश नाकारण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. १२) सकाळी नऊला सर्व रिक्‍त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले. 

विशेष फेरी पुन्हा होणार?
औरंगाबादेत यंदा प्रथमच अकरावीचे प्रवेश ऑनलाइन होत आहेत. या प्रवेश प्रक्रियेला दोन ते अडीच महिने पूर्ण झाले आहेत. असे असले तरी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. परिणामी उर्वरित जागांसाठी पुन्हा विशेष फेरी घेतली जाऊ शकते का याकडे लक्ष लागले आहे.

शाखानिहाय झालेले प्रवेश
कला     २ हजार ४७४
वाणिज्य     २ हजार ३८०
विज्ञान     ७ हजार ४२१
एमसीव्हीसी     ९५६

Web Title: aurangabad marathwada news 594 admission in second round