बद्रीनाथहून पंधरा अपघातग्रस्त भाविक परतले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

उत्तराखंडमध्ये घडली होती दुर्घटना, गंभीर जखमी असलेले सहा भाविक विमानाने येणार
औरंगाबाद - निधोरा (ता. फुलंब्री) येथील भाविकांच्या एका खासगी बसचा ब्रदीनाथहून परताना उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २१) अपघात झाला. यात दोन महिला मृत्युमुखी पडल्या, तर ३३ जण जखमी झालेत. जखमींपैकी पंधरा भाविक गुरुवारी (ता.२७) सचखंड एक्‍स्प्रेसने शहरात आले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. 

बद्रीनाथ महामार्गावर भाविकांची बस दरीत कोसळली होती. यामध्ये ठगणाबाई साबळे आणि भागाबाई साबळे यांचा मृत्यू झाला; तर उर्वरित ३३ भाविक जखमी झाले. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या चौघांना एअर ॲम्बुलन्सने डेहराडूनला हलविण्यात आले होते. इतर २९ जणांवर कर्णप्रयागच्या शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू होते. त्यापैकी १५ जण बुधवारी सचखंड एक्‍स्प्रेसने रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यानंतर त्यांना घाटीत हलविण्यात आले. या अपघातात जखमी झालेले १२ भाविकांनी खासगी बसने परतीचा प्रवास केला. गंभीर जखमी असलेले सहा भाविक विमानाने येत आहेत, अशी माहिती देविदास गाडेकर यांनी दिली. 

यांच्यावर सुरू आहेत उपचार 
चंद्रकलाबाई राऊतराय, कडूबाई गाडेकर, नर्मदाबाई राऊतराय, वंदना राऊतराय, विठाबाई गाडेकर, हिराबाई गाडेकर, नंदाबाई राऊतराय, विनायक राऊतराय, संदीप राऊतराय, विमलबाई राऊतराय, आप्पाराव राऊतराय, खंडू गाडेकर, रावसाहेब राऊतराय, काकासाहेब गाडेकर, संगीता राऊतराय (सर्व रा. निधोरा, ता. फुलंब्री) 

सायरन बंद
आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्‍टर, तसेच कर्मचाऱ्यांना अर्लट करण्यासाठी घाटीतील अपघात विभागात सायरन बसविण्यात आले आहे. अपघातातील रुग्ण येणार याची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सायरन वाजविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वाजला नाही. शेवटी फोनद्वारे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन अर्लट करण्यात आले. 

तातडीने मदतकार्य
अपघातातील जखमींना घाटीमध्ये अभ्यांगत समितीचे सदस्य किरण गणोरे, नारायण कानकाटे, केके ग्रुपचे अकील अहेमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख, फैसल मिर्झा, महंमद आसेफ, जमीर पटेल, ताहेर पटेल, बाबासाहेब खरात, हशू लाला, अजहर शेख, आसेफ खान यांनी मदत केली. केके ग्रुपने सात ॲम्ब्युलन्सची व्यवस्थाही करून दिली होती.

Web Title: aurangabad marathwada news accident affected bhavik return by badrinath