शिक्षकांनी झटकली जबाबदारी; विद्यार्थ्यांना जुंपले कामाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी दांडी, ‘आयटीआय’मधील प्रकार 
औरंगाबाद - येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) नव्याने प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र, ज्या शिक्षकांवर ही जबाबदारी टाकण्यात आली त्यांच्यापैकी शनिवारी (ता.२४) एकही शिक्षक उपस्थित नव्हता. एवढेच नाही, तर आपली जबाबदारी झटकत यासाठी विद्यार्थ्यांना कामाला लावल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला.

दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर आयटीआयच्या प्रवेशासाठी गर्दी वाढली आहे. सध्या आयटीआयच्या ५१ ट्रेड, ११२६ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवड, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत याबद्दल माहिती देणे आणि माहिती पुस्तिकेची विक्री करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, याला हरताळ फासत शिक्षकांनी शनिवारी विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपले होते. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेसाठी आलेल्या पालक, विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका घेण्यासाठी सुट्या पैशांचीही अडचण आली. तिथे बसविलेल्या विद्यार्थ्यांना माहिती सांगताना अडचण येत होती. त्यामुळे अनेकांना योग्य माहिती मिळाली नाही. 

मदत कक्ष नावालाच
प्रवेश पद्धत, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक अडचणी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयटीआयमध्ये मोठ्या थाटात मदत कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र, शनिवारी तोही बंद होता. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.

पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, पुस्तिका विक्री करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र, तिथे अनुपस्थित असलेल्या शिक्षकांनी पुस्तिका विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांना का बसविले याची चौकशी केली जाईल.
- मिलिंद बनसोडे, प्राचार्य, शासकीय आयटीआय

Web Title: aurangabad marathwada news admission process teacher responsibility

टॅग्स