दहा हजार मिळेनात, खरीप कर्जवाटपही रोडावलेलेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मराठवाड्यातील स्थिती, बॅंकांना अजूनही आदेशाची प्रतीक्षा
औरंगाबाद - कर्जमाफीच्या निर्णयादरम्यान शासनाने पेरणीसाठी तातडीचे कर्ज म्हणून दहा हजारांची घोषणा केली असली, तरी मराठवाड्यात एकाही बॅंकेकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

मराठवाड्यातील स्थिती, बॅंकांना अजूनही आदेशाची प्रतीक्षा
औरंगाबाद - कर्जमाफीच्या निर्णयादरम्यान शासनाने पेरणीसाठी तातडीचे कर्ज म्हणून दहा हजारांची घोषणा केली असली, तरी मराठवाड्यात एकाही बॅंकेकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

बॅंकांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांकडून आदेश, पत्र, सूचना आदींची प्रतीक्षा आहे. काही जिल्हा बॅंकांत निधीचीच अडचण आहे, तर दहा हजारांचे लाभार्थी ठरविण्याची यंत्रणाच काही जिल्हा बॅंकांकडे नाही. दुसरीकडे कर्जमाफीच्या तिढ्यामुळे नियमित खरीप पीक कर्जवाटपही रोडावले आहे. तुलनात्मकदृष्ट्या आतापर्यंतच्या कर्जवाटपाची टक्केवारी कितीतरी कमी आहे.

जिल्हानिहाय खरीप पीक कर्जवाटपाची स्थिती
औरंगाबाद

जिल्हा बॅंक- कर्जाचे उद्दिष्ट 445 कोटी. आतापर्यंत 161 कोटी वाटप. 36.21 टक्के
व्यापारी बॅंकांना 646 कोटींचे उद्दिष्ट. आतापर्यंत 72 कोटी वाटप. 11.18 टक्के
ग्रामीण बॅंकांना 109 कोटींचे उद्दिष्ट. आतापर्यंत 18 कोटी वाटप. 16.91 टक्के

जालना
जिल्हा बॅंकेला उद्दिष्ट 120 कोटी. आतापर्यंत वाटप 43 कोटी. 35.92 टक्के
व्यापारी बॅंकांना उद्दिष्ट 834 कोटी. आतापर्यंत वाटप 47 कोटी. 5.64 टक्के
ग्रामीण बॅंकांना उद्दिष्ट 201 कोटी. आतापर्यंत वाटप 16 कोटी, 7.99 टक्के

परभणी
जिल्हा बॅंकेला उद्दिष्ट 175 कोटी. आतापर्यंत वाटप 47 कोटी वाटप. 26.98 टक्के
व्यापारी बॅंकांना उद्दिष्ट 1070 कोटी उद्दिष्ट. आतापर्यंत 163 कोटी वाटप. 15.25 टक्के
ग्रामीण बॅंकांना उद्दिष्ट 154 कोटी. आतापर्यंत वाटप 6 कोटी वाटप. 4.05 टक्के

हिंगोली
जिल्हा बॅंकेला उद्दिष्ट 136 कोटी. आतापर्यंत वाटप 24 कोटी. 17.69 टक्के
व्यापारी बॅंकांना उद्दिष्ट 655 कोटी. आतापर्यंत वाटप 35 कोटी. 5.37 टक्के
ग्रामीण बॅंकांना उद्दिष्ट 93 कोटी. आतापर्यंत वाटप 4 कोटी. टक्केवारी 4.88.

बीड -

जिल्ह्यासाठी एकूण 1900 कोटींचे उद्दिष्ट. आतापर्यंत 46 कोटींचे वाटप. जिल्हा बॅंकेचे आर्थिक व्यवहार गेल्या चार वर्षांपासून बंदच.

लातूर -

जिल्ह्यासाठी एकूण उद्दिष्ट 1548 कोटी 38 लाख, आतापर्यंत 352 कोटी 72 लाखांचे वाटप. 18 टक्के.

उस्मानाबाद -

जिल्ह्यासाठी एकूण उद्दिष्ट 1113 कोटी. आतापर्यंत 100 कोटींचे वाटप. 9 टक्के.

नांदेड -

कर्जमाफीचे निकष, सरकारी आदेशाच्या प्रतीक्षेत नांदेड जिल्ह्यातील नवीन कर्जवाटप आणि दहा हजारांची तातडीची मदत अडकली आहे.

Web Title: aurangabad marathwada news agriculture farmer loan distribution