अनन्याने पटकावला ‘एज्युहब स्मार्ट किड’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

औरंगाबाद - टेंडर केअर होम शाळेच्या अनन्या केंकरे हिने ‘एज्युहब स्मार्ट किड’चा बहुमान पटकावला. संत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी (ता. १५) या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

औरंगाबाद - टेंडर केअर होम शाळेच्या अनन्या केंकरे हिने ‘एज्युहब स्मार्ट किड’चा बहुमान पटकावला. संत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी (ता. १५) या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

गेला महिनाभर शहरातील विविध शाळांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यातून १०० विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. मिस युनिव्हर्स सेकंड रनर अप सौंदर्यवती नवेली देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, कल्याण औताडे यांची उपस्थिती होती. स्टेपिंग स्टोन शाळेच्या ईशा भावसार व ओजस्वी शिंदे यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. प्रमुख विजेतीस लॅपटॉप आणि द्वितीय व तृतीय क्रमांकास सायकल बक्षीस देण्यात आल्या. या स्पर्धेत ११ शाळांनी सहभाग नोंदविला. शेवटच्या फेरीमध्ये सहा शाळांचा सहभाग होता.

या स्पर्धेमध्ये ७५ प्रश्‍नांचा, तर अंतिम फेरीमध्ये ५० प्रश्‍नांचा समावेश करण्यात आला. अचूक वेळेत प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी गुण देण्यात आले. शेवटच्या फेरीमध्ये पी.एस.बी.ए.ची ऋतिका गोराडे, साहिल खोसरे, स्टेपिंग स्टोनची ईशा भावसार, ओजस्वी शिंदे, एस.बी.ओ.ए.ची मीनल पाटील, गीतिका लोहाडे, सेंट झेविअर्स स्कूलची सय्यद सारा, नक्षत्रा पाटील, डी.पी.एस. स्कूलचे संभव संचेती, मंजिरी शिंदे, टेंडर केअर होमची अनन्या केंकरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इमाम हसन यांनी स्पर्धेचे संचलन केले. एज्युहबचे संचालक पंकज अग्रवाल यांनी शहरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नरत राहण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: aurangabad marathwada news ananya win in eduhub smart kid