अग्निशामक विभागाकडून वटवाघुळाला जीवदान

सुषेन जाधव
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - एखाद्या जिवाची तगमग कोणत्याही जिवाला असह्य करणारी असते. मांजात अडकलेल्या वटवाघुळाची तगमगही एकास पाहवली गेली नाही. त्याने थेट अग्निशामक विभाग गाठले आणि पथकास पाचारण करीत चिमुकल्या जिवाची सुटका करून घेतली. 

औरंगाबाद - एखाद्या जिवाची तगमग कोणत्याही जिवाला असह्य करणारी असते. मांजात अडकलेल्या वटवाघुळाची तगमगही एकास पाहवली गेली नाही. त्याने थेट अग्निशामक विभाग गाठले आणि पथकास पाचारण करीत चिमुकल्या जिवाची सुटका करून घेतली. 

मंगळवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास पदमपुरा भागातील संत रोहिदास चौकातील हा प्रसंग. रतन बरतुने यांना एक पक्षी मांजात अडकलेला दिसला. रतन यांचे काका उत्तम बरतुने यांनी ही बाब अग्निशामक विभागाला फोनद्वारे कळविली. तोपर्यंत वटवाघूळ मांजात चांगलेच अडकले होते. त्यांनी तीनदा संपर्क केला असता, व्यवस्थित प्रतिसाद मिळत नव्हता, तोपर्यंत रतन बरतुने यांनी थेट अग्निशामक विभागाचे कार्यालय गाठले. ते थेट अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच घटनास्थळावर पोहोचले. अधिकाऱ्यांनी वटवाघुळाची अर्ध्या तासात सुटका केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली होती, रोडवरील पिंपळाच्या झाडावर हा प्रकार घडल्याने अग्निशामन विभागाचे अधिकारी झाडांवर काय करताहेत, हा प्रश्‍न अनेकांना पडला. वटवाघुळाची सुटका केल्यानंतर त्याला पाणी पाजून झाडावर सोडण्यात आले. 

अग्निशामन विभागाची मोहीम फत्ते
माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गाडी आल्याचे पाहून स्थानिकांमध्ये कुठे काय घडले हा प्रश्‍न होता. पदमपुरा परिसरातील अग्निशामक विभागाचे अधिकारी मोहन मुंगसे, रमेश सोनवणे, राजेंद्र निकाळजे, किशोर कोळी (चालक) यांनी ही मोहीम फत्ते केली.

Web Title: aurangabad marathwada news bat bird life saving