अनाथाच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेत वाढदिवस!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

शेटे दांपत्याने केली पन्नास हजारांची एफडी

औरंगाबाद - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त निरीक्षण बालगृह रिमांडहोम येथील एका अनाथ मुलास दत्तक घेत त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या नावे ५० हजार रुपयांची एफडी केले. शिवाय त्याच्या उच्च शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याचे स्पष्ट केले.

येथील निरीक्षण बालगृहातील सौरभ संजू पोकळे या अनाथ मुलाची शिक्षणाची जबाबदारी घेऊन श्री. शेटे यांनी पत्नी शिल्पा यांचा वाढदिवस साजरा केला. सामाजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी सौरभच्या नावे ५० हजार रुपये फिक्‍स डिपॉझिटमध्ये (एफडी) ठेवले. या वेळी उपस्थित मुलांना शालेय साहित्य, खाऊ वाटप केले. नगरसेवक जनार्दन कांबळे, निरीक्षण सदस्य अवधूत जगताप, अधीक्षक पी. पी. दियेवार, चंद्रभान जंगले, अलका इंगळे, ओंकार काशिद, राहुल आहिरे, दत्ता शेलार, राहुल नरोटे, सुधीर पवार, अक्षय शिंदे पाटील, संजय पाटील, संतोष लाखे, दिनेश सरोने, रणजित साळुंके, सुधीर पळसकर, ज्योतिराम पाटील, अक्षय ताठे, स्वप्निल वाघोणकर, अमोल तांबे, पियुष भुंगे, दीपक माने, किशोर शेळके, धीरज पवार, डॉ. सरफराज, सुरेश जाधव, अनिल शेंडगे, गंगाराम पोटे, शुभम सोळंके, समाधान सोळंके आदी उपस्थित होते.

Web Title: aurangabad marathwada news Birthday to the orphanage higher education!