बहीण-भाऊ बनले ‘सीए’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

औरंगाबाद - इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत प्रशांत व स्नेहलता घुमरे या भावंडांनी यश मिळविले. या दोघांचेही कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण विज्ञान शाखेतून झालेले आहे. 

प्रशांत यास ‘एआयईईई’मध्ये यश मिळवून अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता. तर स्नेहलतास ‘मेडिकल सीईटी’च्या माध्यमातून ‘बीडीएस’ला प्रवेश मिळाला होता. विवेकानंद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सत्यप्रेम घुमरे यांची ही मुले आहेत. या यशाबद्दल विद्याधन महाविद्यालयात प्रा. भाऊसाहेब ढवळे, प्रा. समाधान निकम, प्रा. शिल्पा चव्हाण, प्रा. मालकर राजू, प्रा. सूरज तायडे, गणेश जुमडे, अनिल लोखंडे, अंकुश केदार यांनी या दोघांचा सत्कार केला.

Web Title: aurangabad marathwada news brother & sister become ca