‘काँसेंट्रिक्‍स’चे कॉल सेंटर बंद करण्याच्या हालचालींना वेग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरात २००९ पासून एका नामांकित दूरसंचार कंपनीसाठी ‘काँसेंट्रिक्‍स’द्वारे चालविण्यात येत असलेले कॉल सेंटर अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येथे कार्यरत एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. १३) कंपनीसमोर आंदोलन करीत गोंधळ घातला.कंपनीच्या या निर्णयाविरोधात सर्व कर्मचारी गुरुवारी (ता. १४) तीन दिवस काम बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कंपनीने याविषयी मौन बाळगले आहे.

यासंबंधीच्या निवेदनात म्हटले, की शहरातील नारेगाव येथे १६ मार्च २००९ पासून हे कॉल सेंटर सुरु आहे. येथील कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे कॉल सेंटर बंद करण्याचे तोंडी सांगण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांना ३० टक्‍के पगारवाढ देऊन त्यांची गुडगाव, चंदीगड, विशाखापट्टणम, बडोदा आणि बंगळूरू येथे बदली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक राज्याबाहेर जाण्यासाठी ३० टक्‍के पगारवाढ अपुरी आहे. कंपनी बंद करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापूर्वीच सांगायला हवा. असे झाले नाही. अचानक असे सांगितल्यामुळे आमच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. दरम्यान, याविषयी कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद कामगार आयुक्‍त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त यांना निवेदन दिले आहे.

कंपनी देतेय धमक्‍या
शहरातील कॉल सेंटर बंद होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी कॉल सेंटर बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार दिला होता. त्याचप्रमाणे ‘काँसेंट्रिक्‍स’ कंपनी बंद होत असेल तर आम्हालाही तीन महिन्यांचा पगार देण्यात यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. मात्र ‘तुम्ही दुसरा जॉब शोधा, नाहीतर तुमच्या कुठल्याही चुका काढून तुम्हाला टर्मिनेट करू’ अशा धमक्‍या देण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांच्या या आहेत मागण्या...
तीन महिन्यांचा पगार द्या
कंपनी कधी बंद होणार याची तारीख कर्मचाऱ्यांना सांगा
बदली बाहेरराज्यांत करू नका

Web Title: aurangabad marathwada news concentric call center close