आता ‘जीएसटी’ भरण्यासाठी उसनवारी करावी लागणार - धनंजय शर्मा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - ‘एक कर, एक बाजार, एक देश’ या घोषवाक्‍यासह अमलात आणला गेलेला वस्तू आणि सेवा कर निर्यातीला खर्चिक करणारा आहे. त्यामुळे जीएसटी भरण्यासाठी उसनवारी करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार असल्याची भीती भारतीय निर्यात महासंघ (एफआयईओ) या संस्थेचे उपसंचालक धनंजय शर्मा यांनी व्यक्त केली. 

सीएमआयए आणि एमआयईओतर्फे ‘जीएसटी फॉर एक्‍स्पोर्ट’ या एकदिवसीय कार्यशाळेत धनंजय शर्मा आणि सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी आपले मत मांडले. जीएसटी आणि देशातील व्यापार आणि उद्योगावर होणाऱ्या परिणामांची चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १८) आयोजित करण्यात आला होता. 

जीएसटीचे फायदे ही प्रणाली स्थिरावल्यावर अधिक स्पष्ट होतील, संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जीएसटी सहायता सेलचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी औरंगाबादेतील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जीएसटी स्पर्धात्मक उद्योजकतेकडे नेणारा - कोकीळ
जीएसटी हा करप्रणालीतील महत्वपूर्ण बदल असून त्याची देशभरात चर्चा होत आहे. याचा लहानसह मोठ्या उद्योगांनाही समप्रमाणात फायदा होणार आहे. या माध्यमातून इनपुट टॅक्‍स मिळवता येणार आहे. अगोदरच्या करप्रणालीपेक्षा जीएसटी अधिक सुटसुटीत आहे आणि ऑनलाईन कारभार असल्याने कार्यालयांचे खेटेही मारावे लागत नाहीत. यामुळे भारतीय बाजारपेठ अधिक प्रमाणात स्पर्धात्मक होईल. चीन, फिलिपाईन्स यासारख्या देशांची स्पर्धा करणे सोपे होणार असल्याचे प्रसाद कोकीळ म्हणाले.

निर्यातीची प्रक्रिया होतेय महाग
श्री. शर्मा म्हणाले, ‘‘जीएसटीपूर्वी निर्यातीवर कोणताही कर भरणा करावा लागत नसे. आता प्रत्येक व्यवहारावर जीएसटी भरावा लागत आहे. आता हा माल खरेदी करताना आणि त्यातून तयार माल परदेशात निर्यात करताना जीएसटी भरावा लागत आहे. हा भरलेला जीएसटी परत मिळण्यासाठी ३ ते १२ महिन्यांचा अवधी लागत असल्याने निर्यातीची प्रक्रिया महाग होत आहे. या व्यवसायात असलेल्यांना केवळ माल खरेदीसाठीच नाही तर कर, व्याज भरण्यासाठीही उसनवारी करावी लागेल, अशी भीती वाटते.’’

Web Title: aurangabad marathwada news credit for GST