अब पैसे छोड, पुलिस का झंझट निपटा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - दोन लाखांत सुपारी ठरली. किरण गणोरेच्या हाती दहा हजारच आले. त्यातही दोन मारेकऱ्यांना एक हजार रुपयेच मिळाले. तरीही झटपट, विनाकष्ट मोठी रक्कम मिळेल या मोहापोटी त्यांनी खून केला; पण शहरात खळबळ उडाली. मग पैसे तर सोडा आता पोलिसांपासून वाचव अशीच विनवणी दोघा मारेकऱ्यांनी गणोरेकडे केली. 

औरंगाबाद - दोन लाखांत सुपारी ठरली. किरण गणोरेच्या हाती दहा हजारच आले. त्यातही दोन मारेकऱ्यांना एक हजार रुपयेच मिळाले. तरीही झटपट, विनाकष्ट मोठी रक्कम मिळेल या मोहापोटी त्यांनी खून केला; पण शहरात खळबळ उडाली. मग पैसे तर सोडा आता पोलिसांपासून वाचव अशीच विनवणी दोघा मारेकऱ्यांनी गणोरेकडे केली. 

पत्नी भाग्यश्री होळकर हिने दिलेल्या सुपारीनंतर पती जितेंद्र यांचा शेख तौसिफ व शेख हुसेन ऊर्फ बाबू यांनी गळा चिरून निर्घृण खून केला. यानंतर दोघांसह भाग्यश्री व किरण यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी चौघांची सोमवारी (ता. ११) कसून चौकशी केली. त्या वेळी मोठी माहिती हाती आली. दोन लाखांत सुपारी ठरल्यानंतर किरणने भाग्यश्रीकडून अनामत दहा हजार रुपये घेतले. ओळखीतील शेख तौसिफला त्याने एका महिलेची त्रासातून सुटका करायची आहे, असे सांगितले. त्याने लगेचच होकार देत महिलेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भाग्यश्रीची भेट घडवून आणली. त्यानंतर केवळ एक हजार रुपये तौसिफच्या हाती टेकवले. उर्वरित घसघशीत रक्कम नंतर दिली जाईल, असे गणोरेचे आश्‍वासन घेऊन तौसिफने शेख हुसेनची भेट घेतली. त्यालाही या कटात सामील करून घेत खून केला, अशी माहिती उघड झाली. 

शिवसैनिकाची माहितीचा बनाव
गणोरे एका पांढऱ्या कारमध्ये एका व्यक्तीला दिसला होता. तीच कार होळकर यांच्या घरासमोर उभी असल्याचे पाहून पोलिसांनीही गणोरेचा या प्रकरणात हात असल्याचा संशय आला. यानंतर पोलिस गणोरेच्या घरी गेले. आपण डॉ. नाईकवाडे असून शिवसैनिकाची माहिती घ्यायची, असे गणोरेच्या आईला खोटे सांगत त्यांनी गणोरेला उचलले.

तुम्ही तर नाईकवाडे नाहीत...
घरात पोलिस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांचे पथक घुसले. त्या वेळी त्याच्या आईने किरणला फोन लावून सावंत यांचे बोलणे करून दिले. या वेळी पोलिसांनी घरालगतच सापळा रचला. गणोरे येताच त्याने सावंत यांना पाहिले. ‘तुम्ही नाईकवाडे नाहीत’ असे बोलत असतानाच सावंत यांनी पोलिस असल्याचे सांगताच गणोरेला पळता भुई थोडी झाली होती.

अशी ही बाब..
काही दिवसांपूर्वी पालखी व कावड सोहळ्यात किरण गणोरेने हिरीरीने सहभाग घेतला होता. यात त्याने चक्क महादेवाची वेशभूषा केली होती; परंतु त्यानंतर खुनाच्या प्रकरणात त्याची राक्षसी वृत्ती दिसून आली.

लोळण घेऊन पश्‍चात्ताप...
किरणला घेऊन पोलिस शेख तौसिफच्या घरी गेले. तौसिफला पकडून पोलिस असल्याचे सांगताच त्याचे हातपाय अक्षरशः ढिले पडले. चक्क त्याने घरातच जमिनीवर लोळण घेऊन आपला पश्‍चात्ताप व्यक्त केला. त्याच वेळी घरातील लोकांनीही विरोध सुरू केला; पण पोलिसांनी खाक्‍या दाखविताच सर्वजण नरमले.

Web Title: aurangabad marathwada news crime