दोन कोटी नव्वद लाख देऊनही विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

औरंगाबाद - लग्नातील हुंडा म्हणून ४० कोटी रुपयांची मागणी विवाहितेच्या आई-वडिलांनी पूर्ण न केल्याने १५ जानेवारी २०१० पासून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. या प्रकरणी विवाहितेने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

मैथिली अमित अहिरराव (वय ३३) यांच्या तक्रारीनुसार, पती अमित रमेश अहिरराव, रमेश केशव अहिरराव व सासू यांनी वैयक्तिक खर्चासाठी व व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात २ कोटी ९० लाख रुपयांची मागणी विवाहितेच्या आई-वडिलांकडे केली होती. विवाहितेच्या आई-वडिलांनी मुलीला त्रास होऊ नये यासाठी सासरच्या मंडळींना धनादेशाद्वारे मागणी पूर्ण केली. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू ठेवला. तसेच, नांदायचे नसेल तर नांदू नको, परंतु २ ते ३ कोटी दरवर्षी पाठवून द्यावे लागतील अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सासरच्या जाचाला कंटाळत विवाहितेने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल करून, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार कंदे करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news crime