नगरसेवक कुलकर्णींवर विनयभंगाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

औरंगाबाद - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व सिडको एन-आठचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी याने पाठलाग करून ३९ वर्षीय महिलेची छेड काढली. गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने पुन्हा पीडितेचा पाठलाग करून ‘तू काहीही केले, तरी तुला सोडणार नाही’ असे म्हणून विनयभंग केला; तसेच पतीला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पीडित महिला ही मुलगी क्‍लाससाठी येणार नसल्याचे सांगण्यासाठी गुरुवारी सायंकाळी एमजीएम येथे गेली होती. तेथे तिची मैत्रिण आधीपासूनच तेथे वाट पाहात उभी होती.

त्याठिकाणी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी तेथे येऊन ‘तू काहीही केले, तरी मी तुला सोडणार नाही’ असे म्हणत पीडितेशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर पीडितेने कुलकर्णीला त्याचा जाब विचारला. तेव्हा कुलकर्णीने तेथून दुचाकीवरून पळ काढला. हा प्रकार पीडितेने लगेचच फोन करून पतीला सांगितला. त्यानंतर पतीने घटनास्थळी धाव घेतली. पतीने पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी महिला पोलिस आले. त्यांनी अधिक माहिती जाणून घेतल्यावर ठाण्यात तक्रार करण्याची विनंती केली. दरम्यान, रात्री उशिरा या प्रकरणी सिडको ठाण्यात नगरसेवक मकरंद कुलकर्णीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे स्वरूप आणि साक्षिदारांचे जबाब घेतल्यानंतर आरोपीला अटकेसंदर्भात विचार करू, असे पोलिस निरीक्षक के. एम. प्रजापती यांनी सांगितले. 

सहा महिन्यांनंतर केले धाडस
मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पती व पीडितेने अनेकदा समजावून सांगितल्या नंतरही कुलकर्णीच्या वागण्यात बदल झाला नसल्याने व समजवायला गेल्यावर जगणे अवघड करण्याच्या धमक्‍या देत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: aurangabad marathwada news crime on corporator makrand kulkarni