वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - वाहतूक विभागाने शहरात जोरदार मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या सुमारे सहाशे चाळीस वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. ज्यांच्याकडे कागदपत्रे उपलब्ध होती, त्यांना जागेवरच; तर कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न करणारांना वाहतूक कार्यालयात दंड भरावा लागला. गुरुवारी (ता. २२) सकाळपासून सायंकाळपर्यंत मोहीम सुरू होती. 

शहरातील वाहतुकीची समस्या कायम असून, जागोजाग व महत्त्वाच्या चौकात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. विशेषतः बाजारपेठा व अन्य सार्वजनिक ठिकाणीही वाहने सर्रास रस्त्यांवर लावली जातात, अशांसह नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने जोरदार कारवाई सुरू केली. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेला गुरुवारी मोठा वेग आला. राँगसाइड, विनाहेल्मेट, राँग पार्किंग, सीटबेल्ट न लावणारे, रस्त्यावरच वाहतूक कोंडी करणारे तसेच बाजारपेठांत रस्त्यावर वाहने लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. शहरात सर्वच ठिकाणी विशेष मोहीम घेण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त, निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांसह सुमारे अडीचशे कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते. सकाळपासून रात्रीपर्यंत धरपकड करण्यात येत होती. धोकादायक वाहने चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सहाशे चाळीस वाहनांवर कारवाई झाली. यात त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला असून दोन लाख ८८ हजार रुपये रक्कम गोळा झाली. यातील ९५ वाहनांची प्रकरणे प्रलंबित आहेत.

सर्व वाहतूक विभाग विशेष मोहिमेत सहभागी झाला. यात सहाशे चाळीस वाहनांवर कारवाई करण्यात आली. वारंवार नियम तोडणाऱ्या वाहनधारकांचा यात समावेश होता. आगामी काळातही मोहीम सुरूच राहणार आहे. 
- सी. डी. शेवगण, सहायक वाहतूक आयुक्त.

Web Title: aurangabad marathwada news crime on vehicle by rto