दिल्ली, मुंबईसाठी औरंगाबादहून विमानसेवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात आणखी दोन नवीन विमानसेवा सुरू होत आहेत. "झूम एअरलाइन्स'ची औरंगाबाद-दिल्ली आणि "इंडिगो एअरलाइन्स'ची मुंबई-औरंगाबाद-नागपूर अशी नवीन सेवा येत्या तीन महिन्यांत सुरू होणार आहे.

औरंगाबादेतून राजधानी दिल्ली आणि मुंबईसाठी आणखी विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहे. व्यापारी आणि उद्योजक वर्गाकडून यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. दिल्लीसाठी सध्या एअर इंडिया आणि जेट अशा दोन कंपन्यांच्या विमानसेवा सुरू आहेत. मात्र, विमान प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आणखी किमान एक विमान सुरू करण्याची गरज असल्याने यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. हे लक्षात घेऊन "झूम एअरलाइन्स'ने औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अंतिम मान्यता सप्टेंबरअखेरपर्यंत मिळून ऑक्‍टोबरमध्ये ही विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news delhi & mumbai aeroplane service from aurangabad