‘सकाळ’, ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’तर्फे ईदमिलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

औरंगाबाद - ‘सकाळ’ आणि ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १८) सकाळी साडेदहाला विमानतळाजवळच्या न्यू जय महाराष्ट्र, जुने वाहन बाजार येथे भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर भगवान घडामोडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

या ईद मिलन कार्यक्रमाला संत निरंकारी मंडळाचे झोनल इन्चार्ज कन्हैयालाल डेबरा, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे प्रचारक डॉ. सय्यद रफिक (पारनेर), शहराध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, राजू शिंदे, शेख सोहेल, वैशाली जाधव, ज्योती नाडे, मनोज गांगवे, कमलाकर जगताप, मोहन नाना साळवे, भाऊसाहेब वाघ, किसनराव दहिहंडे, मो. आरेफ सेठ, जमाअत-ए-इस्लामी हिंद चिकलठाणाचे शेख मिन्हाजोद्दीन, औरंगाबाद पूर्वचे अध्यक्ष काजी मकदूम मोहियोद्दीन यांची उपस्थिती राहील.

रमजान महिन्यात महिनाभर रोजे ठेवल्यानंतर बंधुभावाने एकमेकांची गळाभेट घेत ईद-उल्‌-फित्र साजरी केली जाते. यानंतर सर्वत्र राष्ट्रीय एकात्मता, सर्वसधर्म समभाव, सामाजिक एकोपा, बंधुभावाचे प्रतीक असलेले ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामधून सर्वधर्मीय समाजबांधव एकत्र येऊन शिरखुर्म्याचा आस्वाद घेत आनंद द्विगुणित करीत असतात. एकमेकांच्या धर्मातील शांतीचा, एकतेचा संदेश यातून दिला जातो. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद, औरंगाबाद’ यांच्यातर्फे ईद मिलनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: aurangabad marathwada news eidmilan by jamaat-e-islami hind