महावितरणचा ग्राहकांना वाढीव युनिटचा शॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - महावितरणच्या कारभारामुळे शहरवासी चांगलेच हैराण झाले आहेत. रीडिंग घेणाऱ्याच्या चुकीचा फटका ग्राहकांना सहन करावा लागतो आहे. रीडिंग घेणाऱ्यातर्फे अंदाजेच टाकण्यात येणाऱ्या अवाच्या सव्वा युनिटमुळे भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांतून येत आहेत. तसेच मीटर दुरुस्तीची कामेही महावितरणच्या कर्मचाऱ्यांतर्फे वेळेवर होत नसल्यामुळे ग्राहकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. 

शहरातील तीन लाख ग्राहकांना महावितरणतर्फे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. रीडिंग घेणाऱ्यांच्या मनमानी कारभाराने नागरिकांना अवास्तव बिले येत आहेत. ही बिले दुरुस्तीसाठी महावितरणच्या प्रत्येकच कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. कारवाईसाठी नेहमी तत्परता दाखविणारे महावितरणने ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी ग्राहकांतून जोर धरत आहे.

फॉल्टी मीटरचा फटका 
महावितरणतर्फे सदोष मीटर बसवले जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. वारंवार बिले वाढल्याने ग्राहकांना चकरा मारुन पाठपुरावा करावा लागत आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर नवीन मीटर मिळालेच तर ते पुन्हा किती दिवस व्यवस्थीत रीडिंग देईल याची खात्री नाही. नुकतेच काही महिन्यांपूर्वी मीटर बदलले मात्र त्यावर तर नियमित युनिटच्या दुप्पट युनिट दाखवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा तक्रारीनंतर पुन्हा दीडशे रुपये भरा आणि मीटर तपासून घ्या, असा आग्रह महावितरणकडून धरला जातो. मीटर तपासल्यानंतर त्यात काढल्या जाणाऱ्या त्रुटींचा नव्याने त्रास सहन करावा लागतो. दरम्यानच्या काळात प्रचंड बिले आलेली असतात, मग पुन्हा किमान ७० टक्के बिल भरा असा आग्रह धरला जातो. सत्तर टक्के भरणार नसाल तर लाईट कट होईल त्याला आम्ही काहीही करू शकत नाही, असा सज्जड दम मिळाल्याने ग्राहकांपुढे अवास्तव बिले भरल्याशिवाय पर्याय राहत नाही.

Web Title: aurangabad marathwada news electricity unit icrease