अकरावीचे आता होणार स्पॉट ॲडमिशन

अकरावीचे आता होणार स्पॉट ॲडमिशन

रिक्त जागा जास्त असल्याने एफसीएफएस तत्त्वानुसार प्रवेश
शिक्षण विभागाचा ६० टक्के प्रवेश झाल्याचा दावा

औरंगाबाद - अकरावीच्या ऑनलाईन पाच फेऱ्यांनंतरही शिल्लक असणारे प्रवेश आता स्पॉट ॲडमिशनद्वारे करण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वानुसार उर्वरित प्रवेश पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण चार गुणवत्ता याद्या व एक विशेष फेरी अशा पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत ६० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. यापूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळून इतर सर्व विद्यार्थी तसेच यापूर्वी फेऱ्यांमध्ये पहिला पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले, कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या रिक्त जागांपेक्षा कमी असल्याने स्पॉट ॲडमिशन करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश करण्याकरिता गुणवत्तेनुसार गट करुन दिलेल्या कार्यपद्धतीनुसार रिक्त जागा, गुणवत्तेचा गट व विद्यार्थ्याने ऑनलाइन पद्धतीने नोंदविलेली वेळ यानुसार प्रथम प्रवेश यानुसार या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. 

अकरावी प्रवेशाच्या या विशेष फेरीत १८ व १९ ऑगस्ट रोजी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करायचे होते. त्यात अलॉट झालेल्या १ हजार ४११ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चिती केली आहे.

असे झाले फेरीनिहाय प्रवेश 
केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अलॉट झालेल्या १० हजार ५८० विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी, दुसऱ्या फेरीत ४ हजार ७६६ पैकी २ हजार ५४०, तिसऱ्या फेरीत ६ हजार ८७४ पैकी १ हजार २२४, तर चौथ्या फेरीत ३ हजार ६८६ पैकी १ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. म्हणजेच पाच फेऱ्यांमध्ये १३ हजार १५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

असे असतील तीन गट
गट क्र. १ :८० ते १०० टक्के गुण प्राप्त झालेले विद्यार्थी
गट क्र. २ :६० ते १०० टक्के गुण प्राप्त झालेले विद्यार्थी
गट क्र. ३ :जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेले असतील असे सर्व विद्यार्थी (एटीकेटी वगळता)

प्रवेशाचे वेळापत्रक
गट क्र. १ साठी रिक्त जागा संकेतस्थळावर जाहीर,
२० ऑगस्ट
गट क्र. १ असलेले विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने
प्रवेश निश्‍चित करतील, २१ ऑगस्ट
ॲलोकेशन झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चिती, २१ ते २२ ऑगस्ट
गट क्र. २ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे, २२ ऑगस्ट 
गट क्र. २ असलेले विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने
प्रवेश निश्‍चित करतील, २३ ऑगस्ट 
पुन्हा रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल, २४ ऑगस्ट 
ऑनलाइन प्रवेश निश्‍चिती विद्यार्थ्यांनी करायची आहे, ६ आणि २८ ऑगस्ट
ॲलोकेशन झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चिती,
२८ ते २९ ऑगस्ट
अंतिम रिक्त जागांचा तपशील, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com