जयभवानीनगर नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक दहशतीखाली असताना महापालिका प्रशासनाला मात्र गांभीर्य नसल्याने सोमवारी (ता.१८) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाची कोंडी केली.

दीड तासाच्या दीर्घ चर्चेनंतर आयुक्‍तांनी जयभवानीनगरातील नाला मोकळा करण्यासाठी १३५ मालमत्ताधारकांना अंतिम नोटीस बजावण्यात येईल, तसेच शहरातदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले. 

शहरात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस होत असून, या पावसाचे पाणी तुंबत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. जयभवानीनगर, नूर कॉलनीमध्ये अतिक्रमणांमुळे शेकडो घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे सोमवारी सभेला सुरवात होताच नगरसेवक गंगाधर ढगे यांनी नूर कॉलनीचा प्रश्‍न उपस्थित केला. प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करत राजदंड पळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

एमआयएमचे सदस्य नासेर सिद्दीकी, अजीम खान, एडके, आयुब जागीरदार याच प्रश्‍नावर महापौरांच्या डायससमोर आले. प्रमोद राठोड यांनी जयभवानीनगरचा मुद्दा मांडत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप केला.

माधुरी अदवंत यांनी पावसाचे पाणी काढण्यासाठी आलेल्या जेटिंग मशिनच्या पथकाने नागरिकांकडून पैसे वसूल केल्याची तक्रार केली. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता; पण तो खोटा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. सफाई झाली असती तर वसाहतींमध्ये पाणी शिरलेच नसते. शिवाय सर्व नऊ प्रभागात आपत्कालीन कक्ष सुरू करण्याचे जाहीर केले होते, तेही झाले नाही, असे जागीरदार म्हणाले. आत्माराम पवार, जफर शेख, राजू शिंदे, सायरा बानो, नंदकुमार घोडेले आदींनीही प्रशासनावर प्रश्‍नांचा भडीमार केला. राजगौरव वानखेडे यांनी भूमिगत योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला तर विकास एडके यांनी त्यांच्या वॉर्डातही पावसाने दाणादाण उडाल्याचे सांगत शहरातील नाले मोकळे करण्याची मागणी केली. आयुक्‍तांनी खुलासा करताना सांगितले की, शहरातील नाल्यांचा प्रवाह मोकळा करणे आवश्‍यक आहे. त्यासाठीची कारवाई लवकरच सुरू करण्यात येईल. जयभवानीनगरातील नाल्यातील बाधितांना याआधीच नोटिसा दिलेल्या आहेत. आता त्यांना शेवटची नोटीस देऊन प्रत्यक्ष पाडापाडी केली जाईल. 

बाचाबाचीमुळे सभा तहकूब 
एमआयएमचे नगरसेवक व भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नूर कॉलनीच्या आधी जयभवानीनगरातील नाल्याचा खुलासा करण्याची मागणी श्री. राठोड यांनी केली. मात्र एमआयएमचे सदस्य नूर कॉलनीवरून आक्रमक झाले. दोघांत बाचाबाची झाल्याने महापौरांनी सभा पाच मिनिटांसाठी तहकूब केली. 

Web Title: aurangabad marathwada news encroachment on jaibhavaninagar dranageline