कार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

एमआयएमचे आंदोलन ः बेपत्ता अधिकाऱ्याला शोधून देणाऱ्यास बक्षिसाचे लावले स्टिकर
औरंगाबाद - महापालिका आयुक्त चीन दौऱ्यावर असताना विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. १७) प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्घीकी   यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले. तसेच हरवलेल्या शहर अभियंत्याला शोधून देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, असे स्टिकर शहर अभियंच्या बंद दालनासमोर लावण्यात आले. 

एमआयएमचे आंदोलन ः बेपत्ता अधिकाऱ्याला शोधून देणाऱ्यास बक्षिसाचे लावले स्टिकर
औरंगाबाद - महापालिका आयुक्त चीन दौऱ्यावर असताना विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. १७) प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्घीकी   यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले. तसेच हरवलेल्या शहर अभियंत्याला शोधून देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, असे स्टिकर शहर अभियंच्या बंद दालनासमोर लावण्यात आले. 

महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, महापौर भगवान घडामोडे यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेले होते. आयुक्त, पदाधिकारी शहरात नसल्याने सोमवारपासून (ता. दहा) महापालिकेत शुकशुकाट होता तर विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकारीही जागेवर नसल्याने कामे ठप्प होती. एमआयएमच्या नगरसेविका समिना शेख यांच्या वॉर्डात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून, त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, मलबा उचलण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

बसय्ये नगर येथे मलब्याचा ढीग उचलण्यात यावा, यासाठी नगरसेविका शेख समिना या कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांच्याकडे पाठपुरावा करत होत्या. त्यांनी दखल घेतली नाही म्हणून, सोमवारी दुपारी एकला गटनेता नासेर सिद्दीकी, शेख अहेमद, नगरसेविका शेख समिना, अस्मा फिरदोस रफिक पठाण, सरवत बेगम आरेफ हुसेनी, सायराबानो अजमत खान, शेख नर्गीस सलीम सहारा हे प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली यांच्या दालनात भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्या दालनाला कुलूप होते. त्यामुळे कार्यकारी अभियंता अफसर सिद्धीकी यांच्या दालनातील रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले. बेपत्ता असलेल्या शहर अभियंत्याला शोधून देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, असे स्टिकरही या खुर्चीवर लावण्यात आले. असेच स्टिकर शहर अभियंत्याच्या बंद दालनाच्या दारावरही लावण्यात आले.

दुपारी एकपर्यंत दालनाला कुलूप 
एमआयएमचे नगरसेवक भेटण्यासाठी गेले तेव्हा दुपारचा एक वाजला होता. मात्र शहर अभियंत्याच्या दालनाला कुलूप होते. शिपायाकडे विचारणा केली असता, साहेबांनी कुलुपाची चावी सोबत नेली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. आक्रमक सदस्यांनी त्याच्या दालनाच्या दारावर स्टिकर लावले. 

अन्‌ शहर अभियंता अडकले  पाऊण तास आयुक्तांच्या दालनात
महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता सोमवारी (ता. १७) सुमारे पाऊण तास आयुक्तांच्या दालनात अडकून पडले. नेहमीप्रमाणे सायंकाळी सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांच्या दालनाला कुलूप लावले. त्यानंतर सर्वजण निघून गेले. मात्र यावेळी सिकंदर अली दालनात बसलेले असल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. ते अडकल्याचे लक्षात आल्यानंतर धावपळ सुरू झाली. शहर अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यांची अखेर सुटका केली.

प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली सोमवारी सायंकाळी आयुक्त दालनाच्या पाठीमागे स्वीय सहायकांसाठी असलेल्या कक्षात बसले होते. काही फायलींवर त्यांनी येथे बसूनच काम केले. 

आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील ढेकळेही गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर होते. सायंकाळचे सहा वाजले तेव्हा इतर कर्मचारीही निघून गेले. मात्र, सिकंदर अली दालनातच होते. नेहमीचे कर्मचारी गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकले. आत काम करत असलेल्या सिकंदर अली यांनाही कर्मचारी कुलूप लावत असल्याचे लक्षात आले नाही.  बऱ्याच वेळानंतर सिकंदर अली यांना आपण कोंडलो गेल्याचे लक्षात आले.
 शेवटी शहर अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांनी बोलावून घेतले. तेथील कर्मचारी आले. मात्र आयुक्त कार्यालयाचे सील कोणी फाडावे, चावी कोणाकडे आहे, असे प्रश्‍न उपस्थित झाले. शेवटी सुरक्षा रक्षकांकडे चावी सापडली. त्यांनी सील काढून प्रभारी शहर अभियंत्यांची सुटका केली व सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Web Title: aurangabad marathwada news The Executive Engineer's Empty Chair Necklace