दीडशे कोटींच्या निविदांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - महापालिकेमार्फत शहरातील दीडशे कोटी रुपये खर्चून ५२ रस्त्यांची कामे करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा भरण्याची सहा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. महापालिकेने आता १६ नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. 

औरंगाबाद - महापालिकेमार्फत शहरातील दीडशे कोटी रुपये खर्चून ५२ रस्त्यांची कामे करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा भरण्याची सहा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. महापालिकेने आता १६ नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. 

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी जून महिन्यात दिला आहे. त्यानंतर महापालिकेनेदेखील ५० कोटींची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. या दीडशे कोटींच्या ५२ रस्त्यांच्या कामांच्या निविदा गेल्या महिन्यात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. सहा नोव्हेंबर ही निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत होती. दरम्यान, महापालिकेने कंत्राटदारांची प्रीबीड बैठक घेतली होती. त्यात अनेकांनी निविदेत टाकलेल्या जाचक अटींवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही सुधारणा करून १६ पर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग दर्जाचे रस्ते होणार
दीडशे कोटींतून व्हाईट टॉपिंग पद्धतीने करण्यात येणारे रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे होणार असून त्याकरिता आयआरसीने (इंडियन रोड काँग्रेस) ठरवून दिलेले निकष पाळले जातील, रस्त्यांचा दर्जा चांगला राहावा यासाठी महापालिका कोणतीही तडजोड करणार नाही. भविष्यात रस्त्यांच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित होऊ दिली जाणार नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news expansion time for 150 crore tender