‘घाटी’त स्फोटाची अफवा

औरंगाबाद - वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. सचिन राठोड, डॉ. राहुल पांढरे यांनी वॉर्ड २४ च्या पीआयसीयूला भेट देत घडलेला प्रकार जाणून घेतला.
औरंगाबाद - वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. सचिन राठोड, डॉ. राहुल पांढरे यांनी वॉर्ड २४ च्या पीआयसीयूला भेट देत घडलेला प्रकार जाणून घेतला.

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४ मधील पीआयसीयूत वॉर्डबॉयकडून व्हेंटिलेटरचे ऑक्‍सिजन सिलिंडर बदलताना नेहमी होणारा आवाज झाला. तो ऐकून एका नातेवाइकाने स्फोट झाल्याची आरोळी ठोकली आणि एकच गोंधळ उडाला. बघता-बघता संपूर्ण वॉर्ड रिकामा झाला. 

हा प्रकार शनिवारी (ता. नऊ) दुपारी बाराच्या सुमारास घडला. त्यामुळे वॉर्ड क्रमांक २४ मधील सर्वच बालरुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक बाहेर पडले. एकच गोंधळ झाल्याने शेजारीच असलेल्या एमआरआय विभागातून प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर व क्ष-किरण विभागातील डॉक्‍टर आणि सुरक्षा रक्षक वॉर्ड क्रमांक २४ मध्ये पोचले. सुरक्षा रक्षक आणि डॉक्‍टरांनी नातेवाइकांची समजूत काढली आणि वातावरण शांत झाले. त्यानंतर रुग्णांना पुन्हा वॉर्डात दाखल केले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पांढरे यांनी दिली. प्रत्यक्षदर्शी परिचारिका म्हणाल्या, की व्हेंटिलेटरचे ऑक्‍सिजन सिलिंडर बदलताना नेहमी असा आवाज होतो; मात्र नातेवाइकाने असे होताना पहिल्यांदा पाहिल्याने त्यांनी घाबरून स्फोट होणार म्हणून आरोळी ठोकली आणि पीआयसीयूत दाखल त्याच्या चिमुकल्याला घेऊन पळ काढला. त्याच्यासोबत इतर रुग्णांच्या नातेवाइकांनीही रुग्णांसोबत बाहेर धाव घेतली. बघता-बघता वॉर्ड रिकामा झाल्याने पॅसेजमध्ये एकच गोधळ झाला. परिचारिका डॉक्‍टरांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. सचिन राठोड यांनी वॉर्ड २४ च्या पीआयसीयूला भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली; तसेच व्हेंटिलेटर रिपेअरिंग करणाऱ्या टेक्‍निशियनला पाचारण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com