कर्जबाजारी शेतकऱ्याची सोयगावात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

जरंडी (जि. औरंगाबाद) - खरिपाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या अशोक रामू महाजन (वय 53) या कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी जरंडी (ता. सोयगाव) येथे घडली. या प्रकरणी रात्री उशिरा सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

आगामी खरीप हंगामात पीककर्जासाठी बॅंकेने महाजन यांना थकबाकीदार यादीत समाविष्ट केले होते. आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी शेतातच विषारी औषध घेतले. त्यांना उपचारासाठी जळगावला घेऊन जात असताना पाळधी (ता. जामनेर) गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: aurangabad marathwada news farmer suicide