आत्महत्यांचा फास सुटता सुटेना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

सात महिन्यांत ५३१ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

औरंगाबाद - दुष्काळी स्थिती, वाढता कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी जेरीस आले असून, १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०१७ या सात महिन्यांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल ५३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंताजनक असून, बीड जिल्ह्यात सर्वाधिक १०३ आत्महत्या झाल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम आहे. चालू वर्षातसुद्धा शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. उलट परिस्थिती आणखी जास्त गंभीर बनत चालली आहे. 

सात महिन्यांत मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या ५३१ शेतकऱ्यांपैकी ३५३ शेतकरी यामध्ये मदतीसाठी पात्र ठरले असून, ८१ अपात्र ठरले आहेत. ९७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ३ कोटी ५३ लाखांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

Web Title: aurangabad marathwada news farmer suicide