डॉक्‍टर-रुग्ण यांच्यातील अविश्वासाची दरी चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - भारताचे ‘जीडीपी’च्या तुलनेत आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या खर्चाचे प्रमाण बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षा कमी आहे; तसेच देशात द्वितीय आणि तृतीय स्तरांवरील आरोग्य सुविधा या खासगी किंवा धर्मादाय रुग्णालयांवर अवलंबून आहेत; परंतु सेवा देणारे डॉक्‍टर आणि सेवा घेणाऱ्या रुग्णांतील विश्वासात पडत चाललेली दरी आरोग्य सेवेच्या पायाभरणीला घातक असल्याची चिंता दिल्ली येथील कर्नल डॉ. अनिल ढाल यांनी व्यक्त केली. यासाठी प्रतिबंधात्मक, सर्जनशील आणि प्रोत्साहित करणारी पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

शहरात शनिवारी (ता. १६) आणि रविवार (ता. १७) रोपळेकर हॉस्पिटल, रुबी हार्ट केअर सेंटर आणि फिजिशियन असोसिएशन यांच्यातर्फे दोनदिवसीय परिषद पार पडली. कार्डियोलॉजी अपडेट फॉर फिजिशयन या परिषदेचा विषय होता. या परिषदेत देशभरातून दोनशे तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. 

समारोपप्रसंगी डॉ. ढाल म्हणाले, की आरोग्य सोयीसुविधांच्या दृष्टीने भारत काही देशांच्या पुढे असला तरी जगाचा विचार केल्यास परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. याचा प्राधान्याने विचार शासनस्तरावर होणे नितांत गरजेचे आहे. सकारात्मक विचार, योग्य व्यवहार आणि वर्तन आपल्याला तंदुरुस्त ठेवते. हे सैन्य दलातील जवानांकडून शिकण्यासारखे आहे. कारण त्यांचा प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक उपचारावर भर असतो. देशात ९० टक्के लोक जीवनशैलीचे आजार, मधुमेह, रक्तदान, हृदयरोगाचे शिकार होत आहेत. यामध्ये प्राथमिक लक्षणांना दुर्लक्षित करण्याचे प्रमुख कारण आहे.

दिवंगत डॉ. अशोक तुळपुळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एक सत्र घेण्यात आले. यामध्ये डॉ. जगदीश हिरेमठ यांनी हृदय प्रत्यारोपणाबद्दलची जगभरातील कामगिरी आणि देशाचे योगदान याविषयी सादरीकरण केले. या वेळी भोपाळचे डॉ. पी. सी. मनोरिया, हैदराबादचे डॉ. सी. रघू, मुंबईचे डॉ. उदय जाधव, डॉ. चंद्रशेखर पौंदे, डॉ. शिरीष हिरेमठ, डॉ. शिरीष चांदोरकर, डॉ. सी. पी. त्रिपाठी, डॉ. अनिल भालेराव, डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. सतीश रोपळेकर, डॉ. किशोर पारगावकर, डॉ. नरेंद्र वैद्य आदींनी या चर्चेत सहभाग नोंदविला.

Web Title: aurangabad marathwada news The fear of trust between doctors and patients is worrying