औरंगाबादमधील कचराकोंडी फुटणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

औरंगाबाद - तब्बल चाळीस दिवसांनंतर शहरातील कचराकोंडी फुटण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, आता चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेवर प्रक्रिया केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कचरा टाकण्यासाठी जागा ठरविण्याचा निर्णय बुधवारी (ता. 28) विभागीय समितीकडे सोपविला होता. त्यानंतर या समितीने विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी बैठक घेत नारेगावचा पर्याय रद्द करीत दुग्धनगरीची जागा निश्‍चित केली.

सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या हद्द परिसरात कोणत्याही ठिकाणी कचरा टाकण्यास मुभा दिली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चिकलठाणा येथे कचरा टाकण्याचा निर्णय जाहीर केला. या ठिकाणी शुक्रवारपासून (ता. 30) यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news garbage issue