सोशल मीडियावरूनही करा गॅस बुकिंग!

सोशल मीडियावरूनही करा गॅस बुकिंग!

औरंगाबाद - आजच्या काळात सोशल मीडियाची भूमिका अतिशय प्रभावी झाली आहे. सोशल मीडियावर लोक क्षणाक्षणाची माहिती शेअर करीत असतात. सोशल मीडियाचा वापर करमणूक व माहिती मिळावी, या उद्देशाने नागरिक करतात; परंतु आता नागरिकांचा सोशल मीडियाकडे वाढता कल पाहता एलपीजी सेवा देणाऱ्या कंपनीने सोशल मीडियाद्वारे गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात झाली असून इंडेन गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. इंडेन गॅस सिलिंडर वापरणारे ग्राहक आता फेसबुक आणि ट्विटरद्वारे मिनिटांत गॅस सिलिंडर बुक करू शकणार आहेत. 
फेसबुकवरून अशी करा बुकिंग 

जर फेसबुकच्या माध्यमातून गॅस सिलिंडर बुक करावयाचे असेल तर ग्राहकाला इंडेन गॅस फेसबुक पेजवर जावे लागेल. Https://www.facebook.com/IndianOilCorpLimited/ वर गेल्यावर, बुक नाऊ यावर क्‍लिक करावे लागेल. आपण त्यावर क्‍लिक करण्यापूर्वी एक नवीन पृष्ठ उघडेल. या पृष्ठामध्ये आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरणे आवश्‍यक आहे. जसे की, उपभोक्ताचे नाव, ग्राहक क्रमांक आदी माहिती भरल्यानंतर, सबमिट करण्यात येईल. यानंतर आपल्या गॅस सिलिंडरचे बुकिंग केले जाईल. दरम्यान, इतर कंपन्याही हे धोरण राबविण्याची शक्यता आहे.

ट्विटरवरून सिलिंडर बुक
ट्विटरद्वारे सिलिंडर बुक करू इच्छित असल्यास प्रथम आपल्या ट्विटर हँ्डलची नोंद करावी. नोंद केल्यानंतर एक ट्विट करणे आवश्‍यक आहे. या ट्विटमध्ये आपली माहिती द्यावी. नंतर ट्विटर हॅंडल नोंदणीकृत केले जाईल. मग @ इंडेनेफिल # रिफिलवर ट्विट करून आपले सिलिंडर बुक करू शकता. यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा स्वत:ला नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही, दर महिन्याला @ इंडेनेफिल # रिफिलवर ट्विट करून गॅस बुकिंग करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com