ग्रामपंचायती होणार ‘पेपरलेस’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

औरंगाबाद  - ग्रामपंचायतींमधील कामांसाठीचे दप्तर आता सीलबंद होणार आहे. शुक्रवारपासून (ता. सहा) ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहेत. एखाद्या ग्रामस्थाला कर भरायचा असेल किंवा जन्माचा दाखला, विवाहाचे प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर आता एका क्‍लिकवर ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्यांना प्रमाणपत्राची प्रिंट हातात मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमधील सर्व रेकॉर्ड ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

रविवारपासून (ता. एक) या कामाला सुरवात होणार आहे. गुरुवारपर्यंत (ता. पाच) सर्व रेकॉर्ड ऑनलाइन करून सर्व रजिस्टर ग्रामपंचातीमध्येच सीलबंद करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कामाला लागल्या आहेत. आपले सरकार योजनेत ‘ई-ग्रामसॉफ्ट’ ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ती पुरविण्यात आली आहे. जन्माचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, विवाहनोंदणी प्रमाणपत्र, गावातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर आकारणीचे प्रमाणपत्र, निराधार योजनांसाठी वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, वर्तणूक प्रमाणपत्र, वीजजोडणी ना हरकत प्रमाणपत्र, नळजोडणीची परवानगी, बेबाकी प्रमाणपत्र, स्वच्छतागृह असल्याचे- नसल्याचे प्रमाणपत्र, दारिद्य्ररेषेखालील, बेरोजगार प्रमाणपत्र, मालमत्तेचे फेरफार, बांधकाम परवानगी आदी ३३ सेवांची प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळणार आहेत. यासाठी फक्‍त २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी आहे तिथे ऑनलाइन, तर जिथे नाही तिथे ऑफलाइन प्रणालीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

तत्काळ सेवा मिळेल
ग्रामपंचायतीचे दप्तर ऑनलाइन झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आवश्‍यक असणारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे तत्काळ मिळू शकतील. ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीत नऊ मॉड्युल आहेत, यात नागरी सेवा, पंचायत नोंदणी पुस्तक, पंचायत लेखे, स्थावर मालमत्तेची माहिती, जड वस्तू नोंद, सभा व्यवस्थापन, संकलित अहवाल व माहिती, मदत यांचा यात समावेश आहे. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ते ग्रामविकास खात्याच्या सचिव या सर्वांना ही प्रणाली पाहता येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news grampanchyat paperless