मराठवाड्यात गुढीऐवजी फडकवला भगवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

औरंगाबाद - गुढीपाडव्याच्या पूर्वदिनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली होती. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील बहुतांश बहुजन कुटुंबीयांनी पारंपरिक गुढी न उभारता रविवारी (ता. १८) आपल्या घरांवर एकपाती भगवी पताका उभारून संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहराबरोबरच ग्रामीण भागात यंदा मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसले.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये चैत्र प्रतिपदा या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. महाराष्ट्रात त्याला ‘गुढीपाडवा’, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात ‘उगादी’ म्हणतात. अनेक जण त्याला शुभमुहूर्त मानून नवीन खरेदीही करतात; पण वर्ष १६८९ मध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे संभाजी महाराज यांची स्मृती कायम राहावी, यासाठी यंदा गुढी उभारू नये, असे आवाहन बहुजन संघटनांनी सोशल मीडियातून केले होते. त्याला प्रतिसाद देत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अनेक बहुजन कुटुंबीयांनी गुढीऐवजी एकपाती भगवी पताका फडकवली. संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. नवीन खरेदी, गोडधोड करण्याचेही टाळले.

Web Title: aurangabad marathwada news gudhi bhagawa flag