दोन तास दमदार पाऊस!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रविवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दोन तास दमदार बरसलेल्या सरींनी नागरिकांची दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाटात सुरू असलेल्या पावसात अनेक भागांत वीज गूल झाली. रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची २३.८ मिमी इतकी नोंद झाली.

अधूनमधून रिपरिपणाऱ्या सरींमुळे सप्टेंबरअखेर तरी पावसाळा असल्याचे जाणवत आहे. वाऱ्यामुळे कालपासून थंडीदेखील वाढली असून, बोचऱ्या वातावरणात तापमानाने पंचविशीही ओलांडली नाही. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दोन तास सलग टिकलेल्या पावसात जालना रोड आणि लगतचे रस्ते जलमय झाले. वाहनधारकांची चांगलीच पळापळ झाली. जालना रस्त्यावर काही कुरापतखोर चारचाकी चालकांनी जागोजाग साठलेल्या पाण्यातून गाड्या उडवत दुचाकीस्वारांना स्नान घातले.  

अनेक भागांत वीज गुल 
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात रात्री झालेल्या पावसाने अनेक भागांत अंधार झाला. महावितरणच्या यंत्रणेचे तीनतेरा उडाले. अनेक भागांत वीज गुल झाली. रात्रीतून झड लागण्याची आणि विजा पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली.

स्मशान मारुती मंदिर पुन्हा पाण्यात 
संजयनगर ते अहिंसानगर पुलावरून पाणी वाहत होते. पुढे कैलासनगरच्या नाल्यात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढून पाण्याचे लोंढे स्मशान मारुती मंदिरात घुसले. महापालिकेचे बुलडोझर या ठिकाणी पाण्याला वाट करून देत होते. टाऊन हॉल, लोटाकारंजा, नागेश्‍वरवाडी, शिवशंकर कॉलनी, जवाहर कॉलनीत ड्रेनेजलाईन तुंबल्याने पाणी चेंबरमधून उफाळून रस्त्यावर आले.

Web Title: aurangabad marathwada news heavy rain