ऑटोमॅटिक दरवाजासाठी लागतात जवानाचे हात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या चिकलठाणा विमानतळावरील ऑटोमॅटिक दरवाजा नादुरुस्त असल्यामुळे प्रवासी आल्यानंतर सीआयएसएफच्या जवानाला तो दरवाजा हाताने उघडावा लागत आहे. यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर येणाऱ्या गेटजवळ काचेचा ऑटोमॅटिक दरवाजा लावण्यात आलेला आहे. प्रवेश करताना आणि बाहेर येताना अशा दोन्ही ठिकाणी या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यातील प्रवेशाच्या गेटजवळील काचेचे दरवाजे व्यवस्थित आहेत. मात्र, बाहेर पडण्यासाठीचा दरवाजा नादुरुस्त झाला आहे. हा दरवाजा जवळपास एक ते दीड वर्षापासून बिघडलेला आहेत. यामुळे सीआयएसएफच्या जवानांना हा दरवाजा उघडावा लागतो. यासाठी एक जवान तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेबरोबर या जवानाला दरवाजा उघडण्याचेही काम देण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री आल्यानंतरही... 
जालना येथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे खासगी कार्यक्रमासाठी सोमवारी (ता. एक) मुख्यमंत्री विशेष विमानाने चिकलठाणा विमानतळावर आले होते. तेव्हाही सीआयएसएफ आणि विशेष पोलिस सुरक्षा दलाच्या जवानांनी मुख्यमंत्री आल्यानंतर हाताने हे द्वार उघडले.

Web Title: aurangabad marathwada news jawan hand for automatic door