जायकवाडी धरण 100 टक्‍के भरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - जायकवाडी धरण प्रकल्पाने शुक्रवारी सकाळी शंभर टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. त्यामुळे पाण्याची आवक सुरू राहिल्यास गोदावरीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली.

औरंगाबाद - जायकवाडी धरण प्रकल्पाने शुक्रवारी सकाळी शंभर टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. त्यामुळे पाण्याची आवक सुरू राहिल्यास गोदावरीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली.

जायकवाडीतील पाणीसाठा 99.23 टक्‍क्‍यांवर गेल्यानंतर ती पातळी कायम ठेवून उर्ध्व भागातून येणारे पाणी थेट गोदापात्रात व परभणी जिल्ह्याच्या मागणीनुसार डाव्या कालव्यातून व माजलगाव प्रकल्पासाठी उजव्या कालव्यातून सोडण्यात येत होते. गोदावरीच्या पात्रात जवळपास 40 दलघमी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर प्रकल्पाचे उघडण्यात आलेले 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. आज सकाळी जायकवाडी धरणातील पाणीसाठा 2 हजार 909.041 दलघमीवर पोचला. त्यापैकी जिवंत पाणीसाठा 2 हजार 170.935 दलघमी झाल्याने प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: aurangabad marathwada news jayakwadi dam full