आता मोबाईल ॲपवरही जुगार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

औरंगाबाद - मोबाईलवरही जुगार खेळता येतो आणि विजेत्याला दहापट रक्कम मिळते! यावर कुणाचा विश्‍वास बसत नसेल. पण, ही बाब खरी आहे. मोबाइल ॲपवर ऑनलाइन बिंगो नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना गुन्हेशाखेने मंगळवारी (ता. २५) सायंकाळी अटक केली. त्यानंतर हा सारा प्रकार उजेडात आला.

कैलासनगर भागातील काही तरुण अँड्राईड मोबाईलवर फोन टार्गेट बिंगो हा गेम डाऊन लोड करून त्यावर ऑनलाईन जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. त्या आधारे मंगळवारी सायंकाळी कैलासनगर भागातील स्मशान मारुती मंदिराजवळ गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला.

यावेळी मोबाईलवर जुगार खेळत असलेले आठजण जाळ्यात सापडले. यामध्ये गिरीश पंडित नारखेडे (रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी), ज्ञानेश्वर प्रभात मोहिते, शिवाजी छगन ठाकरे, सचिन पंडित अवचार, फैय्याज अमीन कुरेशी (सर्व रा. कैलासनगर), शेख एजाज शेख रऊफ, जुनेद शेरुखान व शेख वसीम शेख शमीम (सर्व रा. संजयनगर,बायजीपुरा) यांचा समावेश आहे. या आरोपींच्या ताब्यातून बिंगो गेम डाऊन लोड असलेले तीन मोबाईल, रोख रक्कम असा सदतीस हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडिक, विकास माताडे, ओमप्रकाश बनकर, संजय जाधव, शिवाजी भोसले, राहुल हिवराळे, संजय धुमाळ यांनी केली.

दहा पट रक्कम मिळत होती..
जुगार खेळवणाराने विशिष्ट रक्कम भरून ऑनलाइन ॲप डाऊनलोड केले. कॅसिनोमध्ये फिरणारे चक्र व त्यात बॉल असतो. अगदी तशीच पद्धत ॲपमधील गेममध्ये आहे. निश्‍चित केलेल्या आकड्यावर बॉल आल्यास तब्बल दहा पट रक्कम दिली जात होती असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news jugar on mobile app