कन्हैयाकुमार ऑगस्टमध्ये औरंगाबाद दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

औरंगाबाद - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार सात ऑगस्ट रोजी औरंगाबादेत येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कन्हैयाकुमारला शहरात आणण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती "एआयएसएफ'चे राष्ट्रीय सदस्य अभय टाकसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कन्हैयाकुमार याचे नगर आणि बीड येथेही कार्यक्रम होणार आहेत. त्याच्या सभेचे ठिकाण व वेळ अद्याप निश्‍चित केली नसल्याचे टाकसाळ यांनी सांगितले. कन्हैयाकुमारला शहरात आणण्यासाठी आंबेडकरवादी, लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष विद्यार्थी युवक व डाव्या संघटना प्रयत्नशील होत्या, असे ते म्हणाले.

Web Title: aurangabad marathwada news kanhaiyakumar aurangabad tour in august