काश्‍मीर ते कन्याकुमारी मोहिमेसाठी देवगिरी क्‍लबचे सायकलपटू रवाना

औरंगाबाद - काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाच्या मोहिमेला हिरवा झेंडा दाखविताना प्रदीप चव्हाण, विवेक भोसले, डॉ. उल्हास शिऊरकर आदी.
औरंगाबाद - काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाच्या मोहिमेला हिरवा झेंडा दाखविताना प्रदीप चव्हाण, विवेक भोसले, डॉ. उल्हास शिऊरकर आदी.

औरंगाबाद - काश्‍मीर ते कन्याकुमारी तब्बल ५० दिवसांची सायकलिंग मोहीम फत्ते करण्याचा विडा देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील सायकलिंग क्‍लबने उचलला आहे. मोहिमेसाठी आठ जणांचा संघ शनिवारी (ता. सहा) दुपारी औरंगाबाद येथून रवाना झाला. महाविद्यालयातर्फे त्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील क्‍लबच्या मोहिमेची सुरवात १२ जानेवारीला काश्‍मीर येथून होणार आहे. ही ५० दिवसांची मोहीम असेल. ‘प्रदूषणमुक्‍त भारत’ व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या सामाजिक उपक्रमाचा प्रचार हे विद्यार्थी करणार आहेत. मोहिमेत ४१ मुक्‍काम होणार असून, जम्मू, पानिपत, न्यू दिल्ली, जयपूर, औरंगाबाद, हैद्राबाद, बंगळुरू आणि कन्याकुमारी या शहरांमध्ये विविध शाळा, महाविद्यालयांत सामाजिक शिबिरे होतील. याद्वारे ५० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

संघाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी मशिप्र मंडळाचे सदस्य प्रदीप चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य विवेक भोसले, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. आर. एम. औटी, प्रा. रूपेश रेब्बा यांची उपस्थिती होती.

क्‍लबचे हे आठ शिलेदार
सायकलिंग क्‍बलचे प्रा. डॉ. मंगेश दसरे, एमबीएचे विद्यार्थी गौरव शर्मा, विनोद साद्धे, अंकित रसाळ, अक्षय शिंदे, ऋषिकेश वाळेकर, कुलजित सिंग, गोकूळ राजपूत हे मोहिमेसाठी रवाना झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com