सिनेस्टाईल चाकूहल्ला; चौघांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - आर्थिक व्यवहारातून भुसार व्यापाऱ्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी अखेर शुक्रवारी (ता. १९) रात्री जवाहरनगर पोलिस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यासह अन्य तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, राजपूत युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत शनिवारी (ता. १९) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष देविचंद बारवाल यांनी केली आहे.

सातारा परिसरातील कुलदीपसिंह अजितसिंह ठाकूर (वय ३२, रोहिदासनगर) यांनी मित्राला पैसे परत करण्यासाठी वेळ दे म्हणून मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. त्यानंतर व्यवहारात मधे मधे का करतो म्हणून चेतकघोडा ते मॅक्‍स हॉस्पिटल या रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ठाकूर यांच्यावर युवराज सिद्ध यांनी चाकूहल्ला केला होता. या वेळी सिद्ध याच्यासोबत भाजपा पदाधिकारी सचिन झवेरी आणि प्रदीप मांडेसह अन्य एक जण होता. जखमी झालेल्या ठाकूर यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटून रस्त्यावरून पळत असताना एका दुचाकीस्वाराला ठाकूरने थांबवत लिफ्ट घेऊन जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. चोवीस तासांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक के. डी. महांडुळे हे करीत आहेत.

झवेरींचा संबंध नाही - तनवाणी 
जवाहरनगर ठाण्यात भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र या प्रकरणाशी झवेरी यांचा काहीही संबंध नसताना विरोधकांनी त्यांना राजकीय सूडभावनेतून या गुन्ह्यात अडकवले आहे, असा दावा भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

Web Title: aurangabad marathwada news knief attack