कोपर्डीप्रकरणी साक्षीदाराच्या उलटतपासणीस खंडपीठाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - कोपर्डी घटनेसंबंधी प्रसारमाध्यमांतील वृत्तांची सीडी तयार करणाऱ्या एकमेव साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज परवानगी दिली. या प्रकरणात क्रमांक दोनचा आरोपी असलेल्या संतोष गोरख भवाल याने खंडपीठात अर्ज दाखल करून सहा साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची मागणी केली होती.

कोपर्डीसंदर्भात दाखविलेल्या बातम्यांची सीडी तयार करणारी व्यक्ती, नगरचे जिल्हाधिकारी, विशेष सरकारी वकील उज्वल निकम, प्रयोगशाळेचे संचालक, एक माध्यम प्रतिनिधी आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळा नगरचे सहायक संचालक हे सहा जण या खटल्यात साक्षीदार आहेत. या साक्षीदारांची तपासणी करण्याची विनंती करणारा अर्ज 10 जुलैला सत्र न्यायालयाने फेटाळला होता. यास खंडपीठात फौजदारी पुनर्विलोकन अर्जाद्वारे आव्हान देण्यात आले होते. वरील सर्वजण या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार असून, त्यांना तपासण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अर्जात केली होती.

शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष खटल्याशी संबंध असलेल्या साक्षीदारास आरोपी पक्षाला तपासता येते. भारतीय पुरावा कायदा कलम 5 व 233 अन्वये काही माणके घालून दिली असल्याचे स्पष्ट केले. सबळ आधार नसताना केवळ खटला लांबविण्यासाठी अशी मागणी केली जात असल्याचे ऍड. गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. खंडपीठाने सहापैकी केवळ एकाच साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यास परवानगी दिली आहे.

Web Title: aurangabad marathwada news kopardi case witness cross cheaking permission by court