‘शिवशाही’सह २१ वाहने फोडली, प्रवाशांची प्रचंड गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

औरंगाबाद - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर शहरात मंगळवारी (ता. दोन) पहाटे पाच वाजता एसटीची सेवा सुरळीत सुरू झाली होती; मात्र सकाळी दहा वाजेनंतर दगडफेकीच्या घटनांमुळे एसटी बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. शहरातील विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये एसटी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली; तर मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या तीन शिवशाही बसच्याही काचा फोडण्यात आल्या. दिवसभरामध्ये २१ बसगाड्यांचे नुकसान करण्यात आले. 

शहरातील कांचनवाडी, गेवराई तांडा, टाऊन हॉल, आमखास मैदान, क्रांती चौक, हर्सूल, सिडको उड्डाणपूल, आंबेडकर चौक, मिलकॉर्नर, सूतगिरणी चौक, औरंगपुरा या भागांमध्ये एसटी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे एसटी महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने विभागातील निम्म्यापेक्षा जास्त फेऱ्या रद्द केल्या. अनेक बसगाड्यांना आगारातच थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी दहा वाजेनंतर जवळपास एसटीची सर्व वाहतूक ठप्प झाली. यामुळे शेकडो प्रवासी बसस्थानकांत अडकून पडले होते. दुपारी दोन वाजेनंतर परिस्थितीचा आढावा घेत आगार व्यवस्थापनाने प्रवाशांच्या मागणीनंतर तब्बल चार तासांनी पुणे, बुलडाणा, नाशिक, धुळे, सिल्लोड, जळगाव या मार्गांवर पोलिस बंदोबस्तामध्ये ५० बस सोडल्या. पोलिसांनी बसच्या पुढे व पाठीमागे बंदोबस्त देऊन गाड्या शहराच्या बाहेरपर्यंत नेऊन सोडल्या. 

साडेतीन लाखांचे नुकसान
शहरात ठिकठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये महामंडळाचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले; तर बसगाड्या रद्द झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news koregaon bhima riot agitation vehicle damage