‘लिभेर’ बनविणार वर्षाकाठी पाच लाख फ्रीज

आदित्य वाघमारे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये कारभार असलेली ‘लिभेर’ आता औरंगाबादेतून भारतीय बाजारपेठेसाठी वर्षाकाठी पाच लाख फ्रीजचे उत्पादन करणार आहे. शेंद्रा येथे पहिल्या टप्प्यात ५०० कोटींची गुंतवणूक करून २० एकरांत उभ्या राहिलेल्या या प्रकल्पातून १ मेपासून वर्षाकाठी ५ लाख फ्रीज तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने बाळगले आहे. 

औरंगाबाद - पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये कारभार असलेली ‘लिभेर’ आता औरंगाबादेतून भारतीय बाजारपेठेसाठी वर्षाकाठी पाच लाख फ्रीजचे उत्पादन करणार आहे. शेंद्रा येथे पहिल्या टप्प्यात ५०० कोटींची गुंतवणूक करून २० एकरांत उभ्या राहिलेल्या या प्रकल्पातून १ मेपासून वर्षाकाठी ५ लाख फ्रीज तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने बाळगले आहे. 

भारतात जर्मन तंत्रज्ञानासह फ्रीज बनविणाऱ्या या कंपनीमध्ये यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू आहे. ५० एकरांचा भूखंड ताब्यात घेतलेल्या या कंपनीने पहिल्या टप्प्यात २० एकरांत प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी कंपनीने ५०० कोटींची गुंतवणूक केली असून, त्यातून १००० थेट, तर ४००० अन्य रोजगार उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात भारतीय बाजारपेठांसाठी दरवर्षी ५ लाख फ्रीज तयार करण्याचे ध्येय कंपनीचे आहे. २५० ते ६५० लीटर क्षमतेचे फ्रीज शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कंपनी तयार करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विस्तारातून निर्यातीसाठी माल तयार केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. १ मे २०१८ ला लिभेर इंडियाचे प्रमुख विक्री अधिकारी राधाकृष्ण सोमयाजी यांच्या उपस्थितीत कंपनीतून पहिले उत्पादन बाहेर पडणार आहे. 

गरजांनुसार देशभरात संशोधन 
देशात एकाच डिझाइनचे फ्रीज न देता तेथील वातावरण आणि गरजांचा अभ्यास ‘लिभेर’तर्फे भारतभर करण्यात आला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवली जाणारी मोठी भांडी, मसल्याच्या साठवणीसाठी खास सोय हवी असते. अशाच विषयांवर ‘लिभेर’तर्फे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, दिल्ली, पंजाब, पश्‍चिम बंगाल राज्यामध्ये गेली पाच वर्षे संशोधन सुरू होते. औरंगाबादेतही संशोधन प्रयोगशाळा कंपनीने तयार केली आहे.

शेंद्रा येथे २० एकरांतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यात यंत्रणा बसविली जाते आहे. १ मेपासून कंपनी उत्पादन सुरू करून ते वर्षाकाठी ५ लाख असेल. ५ वर्षे देशाच्या विविध भागांत संशोधन करून तयार करण्यात आलेले हे प्रॉडक्‍ट भारतीय बाजारपेठेसाठी निर्माण करण्यात येणार आहे. यातून १००० थेट, तर ४००० अन्य रोजगार तयार होतील. 
- श्रीनिवास ज्योती (नॅशनल मार्केटिंग मॅनेजर, लिभेर इंडिया)

Web Title: aurangabad marathwada news libher freeze