सहा महिन्यांत तब्बल दीड हजार कोटींचा तोटा

सहा महिन्यांत तब्बल दीड हजार कोटींचा तोटा

अकरा जिल्ह्यांत दोन हजार दशलक्ष युनिटची गळती

औरंगाबाद - मराठवाड्यातील आठ आणि खानदेशातील तीन जिल्ह्यांत सर्वाधिक गळती होत असल्यामुळे महावितरणला सहा महिन्यांत दीड हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे २,१४१ दशलक्ष युनिटची गळती औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत असलेल्या जिल्ह्यांत झाली असल्याची कबुली सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. आता गळती आणि तोटा भरून काढण्यासाठी कार्यालयातर्फे पावले उचलण्यात येत आहेत. 

डिसेंबर २०१६ ते मे २०१७ पर्यंत लघुदाब ग्राहकांनी ४४१० दशलक्ष युनिटचा वापर केला आहे. त्यापोटी २२६९ दशलक्ष युनिटचे बिलिंग झाले. औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या शहरी भागांमध्ये वीजगळतीचे प्रमाण साधारणपणे ४० टक्के इतके आहे. या भागात आकडे टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोल आदींमुळे ही वीजचोरी वाढली आहे. 

दरम्यान, एप्रिल ते जून २०१७ या काळात औरंगाबाद कार्यालयाने ८ हजार ४०९ वीजचोऱ्या पकडल्या. एकूण ३५४ वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. औरंगाबाद परिमंडळात मार्चमध्ये १८२ कोटी रुपयांची थकबाकी वाढून २१५ कोटींच्या घरात गेली आहे. तसेच जळगाव परिमंडळात मार्च २०१७ मध्ये असलेली ६१ कोटींची थकबाकी मेअखेर ८८ कोटी, लातूर परिमंडळात मार्चपर्यंत १६२ कोटींची थकबाकी मेमध्ये १९७ कोटींवर गेली. नांदेड परिमंडळात २०७ कोटींची थकबाकी मेअखेर २४१ कोटींवर पोचली. प्रादेशिक कार्यालयांतर्गत एप्रिल ते मे या दोन महिन्यांत १२९ कोटी रुपयांच्या थकबाकीची वाढ झाली असल्याची माहिती प्रादेशिक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com