महावितरणच्या मीटर रीडिंगचे क्रॉस व्हेरिफिकेशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

औरंगाबाद - महावितरणमध्ये मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने औरंगाबादसह अकरा जिल्ह्यांमध्ये रीडिंगचे क्रॉसचेक करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. या कारवाईचा भाग म्हणून त्यांनी स्वत: शहरामध्ये बुधवारी (ता. २६) दुपारी थेट क्रॉसचेक करून पाहणी केली. 

महावितरणने मीटर रीडिंग घेण्याच्या कामाचे आऊटसोर्सिंग केलेले आहे. मात्र, ठेकेदार एजन्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या रीडिंगबाबत अनेक तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे चुकीच्या रीडिंग घेतल्याने वाद निर्माण होतात. परिणामी, महावितरणच्या वसुलीवर त्याचा प्रचंड परिणाम होतो. 

महावितरणची वीज गळती आणि वसुली याचे गणित जुळता जुळत नसल्याने रीडिंग घेणाऱ्या एजन्सीचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच सहव्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांनी बुधवारी दुपारी थेट सिडको चिकलठाणा गाठून ही संपूर्ण सिस्टिम जाणून घेत क्रॉसचेकिंग केले.
 सिडकोच्या रेणुकामाता मंदिर परिसरात त्यांनी स्वत: अभियंत्यांच्या माध्यमाने रीडिंग कसे घेतले जाते, ते योग्य पद्धतीने घेतले जातात किंवा नाही याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी चिकलठाणा भागातही भेट देऊन माहिती घेतली. 

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत औरंगाबादसह जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळात अकरा जिल्ह्यात मीटर रीडिंग एजन्सीमार्फत घेतलेल्या वीज मीटरचे किमान पाच टक्के रीडिंग क्रॉस चेक करण्याचे आदेश बकोरिया यांनी दिले. त्याचाच भाग म्हणून त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून मीटरची पाहणी केली व माहिती घेतली. सहव्यवस्थापकीय संचालकांच्या अचानक या तपासणी मोहिमेमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. 

यावेळी शहर मंडळचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, प्रभारी महाव्यवस्थापक विवले, लक्ष्मीकांत राजेली, औरंगाबाद शहर विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ जाधव, सहायक अभियंता विपुल पिंगळे, अविनाश चव्हाण, अभियंते, तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news mahavitaran meter reading cross verification