गळ टोचणीची प्रथा बंद करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

औरंगाबाद - शेंद्रा कमंगर येथील मांगवीरबाबा यात्रेत गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी मातंग समाज परिवर्तन परिषदेने मंगळवारी (ता. तीन) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.

औरंगाबाद - शेंद्रा कमंगर येथील मांगवीरबाबा यात्रेत गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी मातंग समाज परिवर्तन परिषदेने मंगळवारी (ता. तीन) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की राज्य शासनाने २०१३ मध्ये अनिष्ट व अघोरी प्रथा बंदी आणि जादूटोणाविरोधी कायदा संमत केलेला आहे. शेंद्रा येथे बुधवारपासून (ता. चार) मांगवीरबाबा यात्रेला सुरवात होत आहे. या यात्रेत भाविकांना कमरेजवळ लोखंडी गळ टोचण्याची अघोरी प्रथा आहे. या अंधश्रद्धेतून मातंग समाजाला मुक्‍त करण्यासाठी शासनाने कायद्यानुसार बंदी घालावी. याच मागणीसाठी करण्यात येणाऱ्या लाल सेनेच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे, असेही नमूद केले आहे.

निवेदनावर कबिरानंद, डॉ. पंजाबराव गायकवाड, मिलिंद त्रिभुवन, संतोष साठे, ईश्‍वर दणके, संजयकुमार बोडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

परिवर्तनासाठी सरसावल्या संघटना
मांगवीरबाबा यात्रेत गेल्या अनेक वर्षांपासून गळ टोचून घेण्याची प्रथा आहे. ही प्रथा अघोरी असल्याने अनेक संघटना नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सरसावल्या आहेत. लाल सेनेने ही प्रथा बंद करण्यासाठी पोलिसांसोबत नुकतीच बैठक घेतली. आता मातंग समाज परिवर्तन परिषदेनेही हीच भूमिका घेतली आहे.

Web Title: aurangabad marathwada news mangvirbaba yatra issue

टॅग्स