खैंरेंच्या विरोधात भाजपकडून ‘मराठा फॅक्‍टर’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

औरंगाबाद - शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी (ता.२३) मुंबईत केली. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपतर्फे हा नवा फार्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी खासदार खैरे यांच्या तोडीस तोड असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.

औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे अकरा इच्छुक उमेदवार असल्याचा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, शिवसेनेची मतदारसंघावर असलेली मजबूत पकड, विद्यमान खासदार खैरे यांना चारही निवडणुकांत मिळालेले लाखांवरचे मताधिक्‍य पाहता भाजपला खैरेंच्या तोडीचा उमेदवार द्यावा लागेल, याची जाणीव पक्षाला आधीपासूनच आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बैठका आणि ग्रामीण भागातील बूथच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांच्या ताकतीचा अंदाज लावण्यात येत आहे.

याचबरोबर जातीय समीकरणनेही आखली जात आहेत. यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ताजा असल्यामुळे या मुद्‌द्‌याचाही विचार केला जात आहे. अडचणीचे मुद्दे टाळण्यासाठी भाजप मराठा चेहऱ्याचा शोध घेत आहे. अनेक वर्षांपासून अज्ञानवासात असलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्याकडे मराठा उमेदवार पाहण्यात येत आहे. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांचेही नाव चर्चेत आहेत. आणखीही काही नावे आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळेल या विषयीही चर्चा सुरू झाली आहे.

शांतिगिरी महाराजांची मदत घेणार?
केंद्रात भाजपप्रणीत सरकार आल्यामुळे राजकीय साधू-महंतांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. यामुळे वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महंत शांतिगिरी महाराज यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, महाराजांना भाजपकडून कुठलेही उमेदवारीचे आश्‍वासन देण्यात आले नसल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले. मात्र, महाराजांच्या मदतीने भाजप खासदार खैरे यांना मात देण्याचा प्रयत्न करू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.

Web Title: aurangabad marathwada news maratha factor oppose to khaire by BJP