औरंगाबादच्या महापौरपदी युतीचे नंदकुमार घोडेले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - शहराचे बाविसावे महापौर म्हणून शिवसेना-भाजप युतीचे नंदकुमार घोडेले; तर उपमहापौरपदी विजय औताडे विजयी झाले. दोघांनाही प्रत्येकी 77 मते पडली. पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी रविवारी (ता. 29) विजयी उमेदवारांची घोषणा केली. पुढील अडीच वर्षांसाठी ते या पदांवर राहणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

युतीतर्फे घोडेले, एमआयएमतर्फे अब्दुल नाईकवाडी, कॉंग्रेसतर्फे अय्युब खान; तर उपमहापौरपदासाठी युतीतर्फे विजय औताडे, एमआयएमकडून संगीता वाघुले, कॉंग्रेसकडून अफसरखान रिंगणात होते. एकूण 115पैकी 113 सदस्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी, तर 114 सदस्यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.

Web Title: aurangabad marathwada news mayor nandkumar ghodele