एम.फिल.ची सीईटीही होणार ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

औरंगाबाद - गुणवत्तापूर्ण शिक्षण व दर्जेदार संशोधन हा पदव्युत्तर शिक्षणाचा पाया असतो. विद्यापीठातील एम. फिल आणि पीएच. डी. संशोधनाचा दर्जा उंचावण्याचे सामुदायिक प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. दरम्यान, एमफिलसाठीची प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अठरा पदव्युत्तर विभागात एम. फिल अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. १९) महात्मा फुले सभागृहात बैठक पार पडली. बैठकीत पेट, पी. जी. साईटी, प्रवेश प्रक्रिया, एम. फिल यासह विविध विषयांवर चर्चा झाली. विभागांना संशोधनासाठी वाढीव निधी देण्यात आला असून सर्वांच्या सहकार्यातून संशोधनाचा दर्जा सुधारून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवू, असे कुलगुरू म्हणाले. या वेळी विभागाप्रमुखांनी सूचना मांडल्या. विद्यापीठातील विभागात एम.फिल अभ्यासक्रम सुरू आहे.

‘सीईटी’चे वेळापत्रक
एम.फिल सीईटीसाठी ८ ते ३० जुलै यादरम्यान नोंदणी करता येईल. सीईटीची तारीख नोंदणी प्रक्रियेनंतर घोषित करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० जुलैपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एम. फिल. सीईटीसाठी ‘निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम’ असणार आहे. ‘पेट’च्या धर्तीवर ही प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच सर्व विभागांची एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news m.fill cet exam online