एमआयएमचे पाच नगरसेवक संकटात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

औरंगाबाद - दमडी महल परिसरात एका घराचे अतिक्रमण हटविताना महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत कारवाईत हस्तक्षेप केल्याप्रकरणी एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय शनिवारी (ता. सहा) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. विरोधी पक्षनेत्यांसह तीन नगरसेवकांनी; तर दोन महिला नगरसेवकांच्या पतींनी या कारवाईच्या वेळी हजेरी लावली होती. सुमारे पाच तास दमडी महलसह शहरातील अतिक्रमणांवर सर्वसाधारण सभेत काथ्याकूट करण्यात आला. 

शहरातील मुख्य रस्त्यांवर होत असलेल्या अतिक्रमणांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. तीन) तहकूब करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी घेण्यात आली. दुपारी दीड वाजता सभेला सुरवात होताच युतीच्या नगरसेवकांनी दमडी महल येथील कारवाईबाबत प्रश्‍नांचा भडिमार करीत प्रशासनाची कोंडी केली. त्यानंतर कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण सभागृहात दाखविण्याचे आदेश महापौरांनी दिले. दीड तासाचे हे चित्रीकरण पाहिल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली. या वेळी शिवसेना-भाजप नगरसेवकांनी कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या एमआयएम नगरसेवकांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली; तर एमआयएम नगरसेवकांनी कारवाईत कुठलाही अडथळा आणला गेला नाही. शहराच्या विकासासाठी अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. पाच तासांच्या चर्चेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी, विरोधी पक्षनेते फोरोज खान, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेविका सरवत बेगम यांचे पती आरेफ हुसेनी, साजेदा फारुकी यांचे पती सईद फारुकी हे या ठिकाणी आल्याचे दिसून आले. फेरोज खान यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले. त्यांचे हे वर्तन अशोभनीय आहे. त्यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम १० (१-ड) चा भंग केला असून, कलम १० (१-१अ) अन्वये गैरवर्तणूक केल्याबद्दल या पाच जणांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे आदेश दिले.

Web Title: aurangabad marathwada news mim five corporator in disaster