एमपीएससीच्या परीक्षेस दोन हजार उमेदवार गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी रविवारी (ता. १६) पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यासाठी २० हजार २३७ पैकी १७ हजार ९५७ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दोन हजार २८० उमेदवार गैरहजर होते. 

या परीक्षेसाठी शहरात ५७ परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. या केंद्रांवर सकाळी अकरा ते बारा या वेळेत ही परीक्षा पार पडली. दरम्यान, परीक्षा केंद्रावर नाव नसल्याने वाळूज परिसरातील उमेदवारांना मोठी शोधाशोध करावी लागली. हायटेक कॉलेजचे केंद्र शोध ही उमेदवारांसाठी परीक्षा ठरली. हे सेंटर न सापडल्यामुळे काही विद्यार्थ्यांना माघारी जावे लागल्याचेही प्रकार समोर आले. वाळूज येथे या परीक्षेसाठी चार सेंटर देण्यात आले होते. त्यापैकी राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात ४०८ विद्यार्थ्यांची परीक्षा होती; मात्र या केंद्राच्या दर्शनी भागात नामफलकच लावण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. या केंद्रावर ५७ विद्यार्थी गैरहजर होते. यातील सातहून अधिक उमेदवारांना हे सेंटर सापडले नसल्याने परीक्षेस मुकावे लागले असल्याची माहिती काही परीक्षार्थींनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news mpsc exam 2000 candidate absent