तीन दिवसांपासून ‘एमआरआय’ बंद

योगेश पायघन
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी) महागड्या यंत्रांना वारंवार नादुरुस्तीचे ग्रहण लागल्याने रुग्णांची हेळसांड तर इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

रविवारपासून (ता. एक) ‘एमआरआय’ यंत्र बंद ठेवण्यात आले असून या यंत्रातील हेलियम गॅसने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही दुरुस्ती थकबाकीच्या पेचात अडकल्याने गरजूंसाठी असलेल्या नावीन्यपूर्ण योजनेत सातशे रुपयांत एमआरआय तपासणीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

एमआरआयमध्ये असलेल्या हेलियम गॅसचे प्रमाण ४० टक्केपेक्षा अधिक असायला पाहिजे, ते प्रमाण ३२ टक्के झाल्याने कंपनीने या यंत्राने धोक्‍याची पातळी ओलांडली असून ते बंद ठेवण्याचे २६ मार्चला कळवले होते. तसेच यासाठी ९ लाख ७३ हजार रुपयांचा खर्च आहे. एमआरआय यंत्राच्या वार्षिक दुरुस्तीचे ३६ लाख रुपये थकलेले असल्याने ही दुरुस्ती लांबण्याची चिन्हे आहेत.

पाच दिवसांत एमआरआय सुरू करू
यंत्र बंद पडले नसून त्याची गॅसची पातळी कमी झाल्याने एमआरआय बंद ठेवले आहे. त्यासाठी हेलियम गॅस टाकण्याचे कंपनीला कळवले असून पाच ते सात दिवसात गॅस येणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

साई संस्थानच्या मदतीची आशा
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आर्थिक नियोजन आढावा बैठकीत घाटीच्या नव्या एमआरआय मशीनसाठी शिर्डी संस्थानकडे पंधरा कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी पाठपुरावा करत असताना मार्चच्या बैठकीत निर्णय घेऊन मदतीची सकारात्मकता घाटीला दर्शवली होती. मात्र, मार्च संपूनही निर्णय झालेला नाही. 

विद्यार्थ्यांना मनस्ताप
पदव्युत्तर शिक्षणासाठी घाटीकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. इथे शिकण्यासाठी पीजीच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत यंत्रे आहेत; मात्र ती वारंवार नादुरुस्त होत असल्याने या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: aurangabad marathwada news MRI Machine close