अमली पदार्थांपासून दूर राहण्याची गरज

मनोज साखरे
बुधवार, 26 जुलै 2017

औरंगाबाद - ‘भाई, बटन है क्‍या?’ म्याऊँ म्याऊँ है क्‍या’ असा ‘कोड वर्ड’ वापरून महाविद्यालयीन तरुण आणि नशेखोर ‘बटन’ अर्थात ‘नायट्रोसन’ कोकेन, गांजासह विविध अमली पदार्थांचे सर्रास सेवन करीत आहेत. मेट्रोसह देशातील अनेक शहरांत ही समस्या कायम असून, याचा व्यवहारही कोट्यवधींचा आहे. यातून व्यसनाधिनता, शारीरिक व्याधी वाढत असून, त्यात तरुणाईचे नुकसान होत आहे. या प्रश्‍नाविरुद्ध अंमल फारसा नसून पळवाटा जास्त आहेत. त्यामुळे या तस्करीची व्यापकतेसोबतच या प्रश्‍नाची चिंताही अधिकतेने वाढत आहे. अमली पदार्थांच्या तस्करीवरच घाला घालून कठोर कारवायांची गरज व्यक्त होत आहे.

औरंगाबाद - ‘भाई, बटन है क्‍या?’ म्याऊँ म्याऊँ है क्‍या’ असा ‘कोड वर्ड’ वापरून महाविद्यालयीन तरुण आणि नशेखोर ‘बटन’ अर्थात ‘नायट्रोसन’ कोकेन, गांजासह विविध अमली पदार्थांचे सर्रास सेवन करीत आहेत. मेट्रोसह देशातील अनेक शहरांत ही समस्या कायम असून, याचा व्यवहारही कोट्यवधींचा आहे. यातून व्यसनाधिनता, शारीरिक व्याधी वाढत असून, त्यात तरुणाईचे नुकसान होत आहे. या प्रश्‍नाविरुद्ध अंमल फारसा नसून पळवाटा जास्त आहेत. त्यामुळे या तस्करीची व्यापकतेसोबतच या प्रश्‍नाची चिंताही अधिकतेने वाढत आहे. अमली पदार्थांच्या तस्करीवरच घाला घालून कठोर कारवायांची गरज व्यक्त होत आहे.

ड्रग्जची चोरट्या मार्गाने विक्री 
अनेकजण ड्रग्जच्या आहारी जात आहेत. खासकरून तरुणाईचा मोठा समावेश असतो. पार्ट्या, पब, डिस्कोसह खासगी ठिकाणी अशा ड्रग्जचे सेवन केले जाते. त्यासाठी ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्कारी होते. त्यातही तरुणाईच कामाला लागली असून चोरट्या मार्गाने अनेकांपर्यंत हातोहात ड्रग्ज पुरविले जाते. 

ही आहेत नार्कोटिक्‍स ड्रग्ज
कोकीन, मेथाएम्फेटामिन, एम्फेटामिन, रिटालिन, साइलर्ट, इन्हेलेंट हे ड्रग्ज सेवन अपायकारक असून, यामुळे मानसिक बदल होऊ शकतात. अतिसेवनाने शरीरातील ऑक्‍सिजन कमी होतो. त्यामुळे हृदयाचे कार्य अतिवेगवान होते. लीव्हर, किडनीसंबंधित समस्यांसह विविध अपाय होऊ शकतात.

उत्तेजकाचे नकारात्मक परिणाम
ड्रग्ज शरीरात ताजेपण आणि तरतरी आणते. अनेकवेळा खेळाडू अशा ड्रग्जचा सेवनासाठी दुरुपयोग करतात. या ड्रग्जनी क्रीडा क्षेत्राला ग्रासल्याची अनेक उदाहरणे डोपिंग चाचणीतून समोर आली आहेत. जोपर्यंत ड्रग्जचा परिणाम असतो, तोपर्यंत ताजेतवाने वाटते; पण उत्तेजकाचा प्रभाव कमी झाला, की शरीर क्षीण होते. सतत ड्रग्ज घेतल्याने नकारात्मक परिणाम होतात.

गैरवापरच अधिक
मानसिक समस्याग्रस्त रुग्णांना ‘नायट्रोसन’ दिले जाते. लवकर जाग येणे, निद्रानाश होणे, या स्थितीत नायट्रोसन हे शामक म्हणून काम करते; परंतु नशेखोरीसाठी याचा दुरुपयोग जास्त होतो. याचे सेवन केल्यानंतर चेतासंस्थेवर अपाय होतात. नैराश्‍य, झोपाळूपणा, उदासीनता, डोकेदुखी, भोवळ, स्मृती कमजोरी अशा समस्याही उद्‌भवतात, असे तज्ज सांगतात.

‘कोड वर्ड’वरच विक्री
विविध ड्रग्जची टोपण नावे आहेत. त्या-त्या भागात विक्रीनुसार अशी नावे दिली जातात. त्या पदार्थांची छुपी विक्री केली जाते. उदाहरण म्हणजे नायट्रोसनचे टोपण नाव ‘बटन’ आहे. अवैध विक्रीदरम्यान ‘‘भाई, बटन है क्‍या?’’ असे विचारून विक्रेत्याची खात्री केली जाते. ‘कोड वर्ड’ उच्चारल्याने खात्रीचा ग्राहक असल्याचे समजून ग्राहकाला तत्काळ हे ड्रग्ज दिले जाते.  

ड्रग्जचे अपाय
ड्रग्स विविध प्रकारे सेवन केले जाते. यात काही ड्रग्ज मान्यताप्राप्त आहेत, तर काहींचा वापर करणेच बेकायदा आहे. ड्रग्ज पदार्थांचा दुरुपयोग अनेक शारिरिक व्याधींना निमंत्रण देतो. अनेकवेळा अतिसेवनानेही मृत्यू संभवतो. 

विक्रीवर आळा घालण्यासाठी...
गांजा, व्हाईटनर, पेट्रोलची नशा सर्रास होते; परंतु त्यापेक्षाही अधिकतम पातळीवर नायट्रोसन या हायपोटोनिक ड्रग्जची चटक नशेखोरांना लागली. नायट्रोसनची मागणी होत असल्यामुळे या ड्रग्जच्या अवैध विक्रीतही वाढ होत आहे. या मादक, अमली द्रव्यांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० कलम १८, २२, २७, तसेच जीवितास धोका पोचवणे, (भारतीय दंड संहिता, कलम ३२८) नुसार; तसेच नार्कोटिक्‍स ड्रग्ज अँड सायकोट्रिक्‍स सबस्टन्सेस कायदा १९८५ नुसार कारवाई होते.

बंदी असूनही...
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने २०१६ पर्यंत घेतलेल्या निर्णयानुसार ३४४ प्रकारची ड्रग्ज, औषधींची विक्री व कॅटेगिरीनुसार, उपयोगास बंदी घातली आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या आकडेवारीनुसार, बंदी घातलेल्या अमली पदार्थ व त्याच्याशी निगडित व्यवहारातील २० कोटी ७१ लाख ४७ हजार ९७७ रुपयांची रक्कम २०१४ ला, तर २०१५ ला २० कोटी ३५ लाख ४५ हजार ५२२ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. या आकडेवारीतून देशात अमली पदार्थांच्या फोफावत चाललेल्या व्यवहाराची व्यापकता लक्षात येते.

Web Title: aurangabad marathwada news The need to stay away from drugs